आंदोलनाची धार वाढवा, घाबरू नका
- माजी आमदार प्रा विरेंद्र जगताप
चांदूर रेल्वे:-
राज्यात ओला दुष्काळाचे सावट आहे, निराधारांचे पेमेंट वेळेवर होत नाही, गावात अनेक समस्या आहे त्या विरोधात आवाज उचला लोकांमधे मिसळा, आपल्या आंदोलनाची धार वाढवा, प्रशासन विरोधात आंदोलन करतांना घाबरू नका.अशा सूचना वजा आदेशच माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांनी काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
जिल्हा परिषद, नगर परिषद, व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडली त्यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, तालुका अध्यक्ष अमोल होले, शहर अध्यक्ष निवास सूर्यवंशी, माजी जिप सदस्य गणेश आरेकर, माजी जिप अध्यक्ष नितीन गोंडाने, युवक काँग्रेस चे परिक्षित जगताप आदी मंचावर उपस्थित होते.
विधान सभा निवडणुकीत प्रयत्न करून ही आपल्याला अपयश आले त्याच्यावरून आपण शिकलो पाहिजे सध्या देशात व राज्यात ज्या प्रकारचा अनागोंदी कार्यक्रम सुरू आहे त्यावरून आपल्यालाही निवडणूक डोळ्यात तेल घालून लढवावी लागणार आहे, निवडणुकी पूर्वी आपापल्या मतदार संघातील मतदार यांद्यांचा बारकाईने अभ्यास करा, बाहेर गावचे मतदार, मृत मतदार, नवे मतदार यांचा अभ्यास करा अतिरिक्त मतदारांवर लक्ष ठेवा, चुकीचे आढळून आल्यास हरकती घ्यावी, यासह मित्र पक्षांसोबत युती करायची का? यावर ही यावेळी कार्यकर्त्यांकडून मते जाणून घेतली. आंदोलन करतांना घाबरू नका प्रशासनाच्या चुका त्यांना दाखऊन द्या, आपसी मतभेद दूर सारा आणि एकजुटीने येणाऱ्या निवडणुकींना सामोरे जाण्याचे आवाहन यावेळी माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांनी यावेळी केले. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे हर्षल वाघ आणि सुनील अग्रवाल यांनी मत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. RS NEWS सक्षम महाराष्ट्र यावर बातम्या व जाहिराती करिता संपर्क मुख्य संपादक राजीव शिवणकर मो 9860021481

Post a Comment
0 Comments