Type Here to Get Search Results !

No title

 *शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्‍या निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्ष आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक संपन्न*



अमरावती, दि. 30 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रम घोषित केला आहे. यासंदर्भात अमरावती विभागातील राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी, शिक्षक मतदार संघ तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आज झाली. 



    अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्‍या दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्‍याने तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंबंधीची जाहीर सूचना परिशिष्ट ब व पहिली अनुसूची दि. 30 सप्‍टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी बैठकीत दिली. 


*पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्‍पे*

             मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्‍वये जाहीर सूचना दि.30 सप्‍टेंबर प्रसिद्ध करण्यात आली. मतदार नोंदणी अधिनियमानुसार वर्तमान पत्रातील सूचनेची  प्रथम पुनर्प्रसिध्‍दी दि.15 ऑक्‍टोबर रोजी होईल. वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुनर्प्रसिध्‍दी दि.25 ऑक्‍टोबर रोजी होईल. नमूना-19 व्‍दारे अर्ज स्‍वीकारण्‍याची शेवटची तारीख 6 नोव्‍हेंबर आहे. हस्‍तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.20 नोव्‍हेंबर रोजी होईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्‍दी दि.25 नोव्‍हेंबर होईल. दावे व हरकती स्‍वीकारण्‍याचा कालावधी दि.25 नोव्‍हेंबर ते दि. 10 डिसेंबर असा आहे. दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे यासाठी  दि.25 डिसेंबर हा दिवस निश्चित आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी दि.30 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली. 



मतदार पात्रतेचे निकष तसेच अनुषंगीक अटी व शर्ती याबाबत विभागीय आयुक्तांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली. त्या म्हणाल्या की, नमूना क्रमांक-19 मधील एकगठ्रठा अर्ज, मग ते व्‍यक्तिशः दाखल केलेले असोत अथवा पोस्‍टाने पाठविलेले असोत, मतदार नोंदणीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.  तथापि, पात्र शैक्षणिक संस्थेचे प्रमुख हे त्यांच्या संस्‍थेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित पाठवू शकतील. राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, रेसिडेन्ट वेलफेअर असोसिएशन यांना एकगठ्ठा अर्ज करता येणार नाहीत, असेही डॉ. सिंघल यांनी यावेळी सांगितले.


*नमुना 19 ऑनलाईन उपलब्ध*

                मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागीय आयुक्‍त हे मतदार नोंदणी अधिकारी असून त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार हे पद‌निर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्‍यांच्या कार्यालयामध्‍ये नमूना-19 मधील अर्ज दि. 6 नोव्‍हेंबरपर्यत सादर करता येतील. नमूना-19 मधील अर्ज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ( https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Graduates-and-Teachers-Constituencies-2025.aspx ), त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या व विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्‍थळावर नमूना-19 मधील ऑनलाईन अर्ज उपलब्‍ध आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.



*शिक्षक मतदारसंघाच्‍या निवडणुकीसंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक*

भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रम घोषित केला आहे. याअनुषंगाने आवश्यक कार्यवाही व नियोजनासाठी मतदार नोंदणी अधिकारी, शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम व वेळापत्रक, मतदार नोंदणी पात्रतेचे निकष, एक गठ्ठा अर्ज आदी महत्वाच्या विषयासंदर्भात विभागीय आयुक्तांनी बैठकीत माहिती दिली. शिक्षण क्षेत्रातीली सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते.


RS NEWS सक्षम महाराष्ट्र.                         यावर बातम्या व जाहिराती करिता.         संपर्क- 9860021481.                             मुख्य संपादक.                                          राजीव शिवणकर 

Post a Comment

0 Comments