Type Here to Get Search Results !

श्रीक्षेत्र घुईखेड येथे श्री संत बेेंडोजी महाराज संजीवन समाधी प्रगट दिन सोहळा ५ ते १२ एप्रिल पर्यंत कीर्तन,अखंड हरिनाम सप्ताह,सामूहिक ग्रंथ पारायण.१२ एप्रिल रोजी दूपारी महाप्रसाद

 श्रीक्षेत्र घुईखेड येथे श्री संत बेेंडोजी महाराज संजीवन समाधी प्रगट दिन सोहळा ५ ते १२ एप्रिल पर्यंत कीर्तन,अखंड हरिनाम सप्ताह,सामूहिक ग्रंथ पारायण.१२ एप्रिल रोजी दूपारी महाप्रसाद

विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांचे देवस्थान . श्री क्षेत्र घुईखेड संस्थान 


चांदूर रेल्वे-ता,

 

संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आणि विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांचे देवस्थान आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील सुप्रसिध्द श्री.संत बेंडोजी महाराज यांचे संजीवन समाधी प्रगट दिन सोहळा दरवर्षी प्रमाणे श्री बेंडोजी महाराज संस्थान,घुईखेड व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ५ एप्रिल पासुन प्रारंभ झाला असुन १२ एप्रिल पर्यंत चालणार आहे.यामध्ये कीर्तन महोत्सव,अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत बेंडोजी महाराज भक्त महिमामृत ग्रंथ सामूहिक ग्रंथ पारायण आयोजित करण्यात आले आहे.



                ५ ते ११ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी ८ ते १०  अनुक्रमे हभप स्नेहाताई दुधवडे (नागपूर),हभप भूषण महाराज गिरी (आळंदी),हभप सारंग महाराज ढोरे (अंजनसिंगी),हभप नामदेव महाराज निचत (नांदगाव खंडेश्वर),हभप कार्तिक महाराज चावात (येवती),हभप शिवानीताई घोंगडे (पिंपळखुटा),हभप रामकृष्ण महाराज भागवत (घारफळ) यांचे कीर्तन राहणार आहे. ग्रंथ पारायण हभप गणेश महाराज गावंडे (घुईखेड) करणार असुन भक्त महिमामृत ग्रंथ सकाळी ६.३० ते ९ होणार आहे. त्यांना गायनाचार्य हभप शुभम महाराज देहानकर (नागपूर),मृदंगाचार्य मंगेश महाराज बाभूळकर यांची साथ राहणार आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२.३० वाजता हभप मधुकर महाराज पाचपुते (वाळकी नेर) यांचे कीर्तन होणार असुन त्यानंतर दुपारी १ ते ५ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा आणि या सोहळयाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर,राजाभाऊ चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments