चांदुर रेल्वे मध्ये विविध ठिकाणी महात्मा फुले जयंती साजरी महापुरुषांनी जो लढा आणि क्रांती घडून आणले तो विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू अध्यक्ष सौं प्रियंका विश्वकर्मा यांचे मत
चांदूर रेल्वे
चांदुर रेल्वे तालुका हा क्रीडा सांस्कृतिक राजकीय सामाजिक कार्यक्षेत्र अग्रेसर असून या शहरांमध्ये महामानवांच्या जयंती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. सर्व जातीसमभाव या उद्देशाने या कार्यक्रमाला गावातील नागरिक प्रामुख्याने हजर असतात आज महामानव राष्ट्रपिता क्रा.ज्योतीबा महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने चांदुर रेल्वे शहरात विविध ठिकाणी करण्यात आली चांदुर रेल्वेचे प्रथम नागरीक सौ प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी प्रत्येक कार्यक्रमाला जाऊन राष्ट्रपिता क्रांती ज्योतिबा फुले यांना हरार्पण करून अभिवादन केले संपूर्ण नागरिकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांनी महामानवांच्या जीवनातील उदाहरणे देऊन त्यांच्या जयंतीनिमित्त विनामूल्य महामानवांचे पुस्तक वाटप करण्याचा निर्धार त्यांनी घेतला ज्या पुस्तकातून विद्यार्थ्यांचा व समाजाचा विकास होईल या उद्देशाने त्यांनी निश्चय केला.
अभिवादन सोहळ्यासाठी गावाचे प्रतिष्ठित नागरिक मा. प्रा. प्रभाकरजी वाघ मा.निलेश विश्वकर्मा अमोल भाऊ होले बच्चुभाऊ वानरे गजू भाऊ ठाकरे पप्पू भाऊ भालेराव देशमुख अनिल मोटवानी सभापती नगरपरिषद चांदुर रेल्वे अनिस भाई सौदागर हर्षल वाघ सुमेध सरदार अरिहंत गेडाम विलास आठवले निवास सूर्यवंशी प्रफुल कोकाटे राहुल जी इमले सुनील मालखेडे देवानंद भाऊ खुणे कार्यक्रमाला उपस्थित होते .



Post a Comment
0 Comments