*चांदूर रेल्वेत वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी; नगरसेविका कीर्ती राहुल इमले यांचा पर्यावरणपूरक उपक्रम*
*चांदूर रेल्वे, प्रतिनिधी:* येथील प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका कीर्ती राहुल इमले यांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत प्रभागातील महिला मंडळाच्या सहकार्याने वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमा हा आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यावेळी बोलताना नगरसेविका कीर्ती राहुल इमले म्हणाल्या, “हा केवळ कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प आहे. आज वाढत्या प्रदूषणाच्या आणि हवामान बदलाच्या काळात प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.”
या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करिता काँग्रेसचे गटनेते तथा नगर परिषद सदस्य अनिस सौदागर, नगरसेविका निलोफर शेख व नगरसेवक हर्षल वाघ यांच्या उपस्थितीत लावली. यावेळी प्रत्येक मान्यवरांनी एक वृक्ष लावून संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक अनिता कडू, अर्चना मोरे, प्रतिभा कारमोरे, कविता अग्रवाल, वैशाली धोटे, जोशना जिचकर, वैशाली कावलकर, मंगला राऊत, संध्या साबळे, जया राऊत, संगीता सूर्यवंशी, वैशाली कुंभारे, पद्मा अर्जापुरे, प्रिया शिंगांजोडे, नेहा शर्मा तसेच नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता आशिष कुऱ्हाडे, वरिष्ठ लिपिक जितू करसे, मनिष कनोजे, पंकज इमले, सुनील दांडेकर यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments