*चांदूर रेल्वे येथे मंदिर संघटनाचा ऐतिहासिक टप्पा*
_80 हून अधिक मंदिरांचे विश्वस्त एकाच व्यासपीठावर; महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संघटनात्मक कार्याला मोठे यश_
चांदूर रेल्वे, दि. १९ जुलै : महाराष्ट्र देवस्थान समितीच्या व्यापक उद्दिष्टांना बळ देण्यासाठी प्राचीन चंद्रभागेश्वर महादेव संस्थान, महादेव घाट, चांदूर रेल्वे येथे आयोजित करण्यात आलेली चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संयुक्त मंदिर समितीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीला 80 हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, अध्यक्ष, सचिव, पुजारी, सेवेकरी व धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत मंदिर संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन, देवस्थान इनाम जमिनींचे संरक्षण, मंदिरांचे पारदर्शक व्यवस्थापन, धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी प्रभावी समन्वय, मंदिरांच्या कायदेशीर समस्या, मंदिर विकास, जनसहभाग आणि जिल्हास्तरीय मंदिर संघटन अधिक सक्षम करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याला मंदिर विश्वस्तांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, विविध तालुक्यांतील मंदिरांचे विश्वस्त प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आल्याने मंदिर चळवळीला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी आशिष मारुडकर, निलेशजी टवलारे, कैलाशभाऊ पनपालिया, ओमप्रकाश परतानी, कैलासभाऊ गिरोलकर, बच्चूभाऊ वानरे,धनराज वेलणकर, कृष्णभाऊ मारुडकर, धीरज चांडक, रोहन ढोमणे, भूषण मेने, श्रीकृष्ण माहोरे, प्रकाश चव्हाळे, राजेंद्र मस्के, श्री घुगे, मुरलीधर पलके, श्रीकांत देशपांडे, सुनील अग्रवाल, राजेश सोनी, वैभव पोद्दार, निलेश गुल्हाने, सुधीर आढाव, विनय देशमुख, राजाभाऊ देशमुख, पद्माकर घेरडे, गजानन ठाकरे, प्रवीण घुईखेडकर, उषा गिरसवडे, सुवर्णा पाखोडे, अंजली अग्रवाल, रमेश जयसिंगपूरे, अजय गाडे, गोपाल आखरे, राजेंद्र डेरे, सुधीर डेरे, प्रशांत कोठेकर, शंकरलाल मानकाणी, अतुल मेटे, श्याम जोशी, स्वप्नील चौधरी, नेमाडे गुरुजी, नरेश देशमुख, मारुती गुजडे, सुनील मालखेडे, सचिन वर्मा, नकुल भैसे, सोपान पापडकर, अनिल वाढोनकर, रवींद्र डेरे, गजानन ढगे, डॉ. नरेंद्र डेरे, अनिल वाट, श्रेयस देशमुख, अरुण उमक, बाळासाहेब वानखेडे, रवींद्र भोयर, मुकेश पवार, विजय करडे, अनिल काळमेघ, रवींद्र काळमेघ, विनोद वानखेडे, सुनील खर्डे, श्याम घाटे, सुनील वाढोणकर, संजय मेने, सुनील दहातोंडे आणि धनंजय पडवळ यांच्यासह अनेक मान्यवर विश्वस्त उपस्थित होते.
धर्मदाय कार्यालय वकील संघ अध्यक्ष ॲड. नरेश पारडशिंगे यांनी कायदेशीर मोलाचे मार्गदर्शन दिले
बैठकीत सर्व उपस्थितांनी "एक मंदिर – एक संघटन – एक दिशा" हा संकल्प दृढ करत मंदिरांचे संरक्षण, विकास आणि सशक्त संघटनासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आगामी काळात अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशाच बैठका आयोजित करून सर्व मंदिरांना एकत्र आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरांचे हक्क, देवस्थान मालमत्तेचे संरक्षण, कायदेशीर मार्गदर्शन आणि शासनाशी प्रभावी समन्वय या माध्यमातून मंदिर संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
ही बैठक महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वाढत्या प्रभावाची साक्ष ठरली असून, अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात मंदिर संघटन अधिक बळकट करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
या बैठकीत अमरावती जिल्हा कोर कमिटी श्री कैलासजी गिरोळकर, श्रीकृष्ण माहोरे, ओमप्रकाश जी परतानी, श्रीकृष्णाजी मारोडकर, श्री विनोद भाऊ वानखडे, श्री विजयजी करडे, रोहनजी ढोमणे यांची घोषणा करण्यात आली.
श्री धनराज जी वेलणकर यांची वर्धा जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Post a Comment
0 Comments