लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसड यांच्या संकल्पनेतून मालखेड येथे जनकल्याण शिबिराचे उद्घाटन मा. श्री नेमाडे गुरुजींच्या हस्ते
मालखेड (प्रतिनिधी) – धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री प्रतापदादा अडसड यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालय, मालखेड येथे जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान, श्रीक्षेत्र सावंगा (विठोबा) चे अध्यक्ष मा. श्री पुंजारामजी वै. नेमाडे (नेमाडे गुरुजी) यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मालखेड ग्रामपंचायतीच्या प्रशासक श्रीमती लता पाटील यांनी नेमाडे गुरुजी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी गावातील नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये राज्य व केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या तज्ज्ञ चमूने आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मा. श्री नेमाडे गुरुजी यांनी शासनाच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व असल्याचे सांगितले व या उपक्रमाचे कौतुक केले.
RS NEWS सक्षम महाराष्ट्र
मुख्य संपादक : राजीव शिवणकर
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क : 9860021481. साप्ताहिक सक्षम पुकार
Post a Comment
0 Comments