*चांदुर रेल्वे:- ता.प्र*
चांदुर रेल्वे तालुक्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड येथे आज दिनांक 22/09/2025 रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत भव्य आरोग्य मेळावा पार पाडला याचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ लताताई महल्ले यांच्या हस्ते पार पडले सर्वप्रथम दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्याला डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथील बाल रोग तज्ञ कान नाक घसा रोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ त्वचारोग तज्ञ असे विविध तज्ञाकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली एकूण 157 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी उपसरपंच सौ जयाताई चव्हाळे माजी सभापती श्रीमती सरिताताई देशमुख सहाय्यक संचालक कुष्ठ रोग डॉक्टर पुनम मोहकर मॅडम चांदुर रेल्वे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका निकोसे मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश मानकर डॉक्टर वर्षा बिजवे डॉक्टर अविनाश पवार डॉक्टर चैतन्य बुरखंडे डॉक्टर स्नेहा खंदारे व डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर आर बी राठी डॉक्टर निलक्षी दुगणे डॉक्टर प्रेरणा भागवत डॉक्टर राहुल बिजवे डॉक्टर चेतन यांचे प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात लोकांचे रक्तगट तपासणी एचआयव्ही तपासणी एचबी तपासणी इसीजी आधार कार्ड गोल्डन कार्ड किशोरवयीन मुलांचे आरोग्य समुपदेशन व पीएनसी चेकअप व इतर आजारांची तपासणी व उपचार व मार्गदर्शन करण्यात आले या शिबिराचा यशस्वी करिता प्राथमिक आरोग्य केंद्र येथील व उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले


Post a Comment
0 Comments