Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर व्हावा आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे यांच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.

 *हेक्टरी ५० हजार मदतीची गर्जना – तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार*



चांदूर रेल्वे (प्रतिनिधी): खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर व्हावा आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे यांच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.



छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर नगरपरिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभि


वादन करण्यात आले. पुढे मोठ्या जनसमुदायासह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.

मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार मा. प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी केले. शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने मोर्चा भव्यदिव्य ठरला.



मोर्चादरम्यान “नागपूरचा पिंट्या काय म्हणते – सोयाबीनला भाव नाही म्हणते”, “फडणवीस सरकार हाय हाय – शेतकरी सरकार झिंदाबाद”, “हेक्टरी पन्नास हजार द्या – नाहीतर गादी खाली या” अशा प्रचंड घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 मोर्चातील प्रमुख मागण्या:

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.

शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा.

महावितरणकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी अवास्तव विजबिल तातडीने रद्द करावीत.

रोजगार हमी योजना व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व पात्रांना त्वरित द्यावा.

. गावागावांत सुरू असलेले लोडशेडिंग बंद करून अखंडित वीजपुरवठा द्यावा.




तहसीलवर पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर मोठ्या सभेत झाले. या सभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या तसेच शासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र टीका करण्यात आली. सभेनंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या दिवाळीपूर्वी मान्य न झाल्यास एस.डी.ओ. कार्यालयामध्ये बेसन भाकर घेऊन काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार करुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी दिला.



मोर्चा आणि सभा पूर्णपणे शांततामय वातावरणात पार पडली. कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग यामुळे हे आंदोलन यशस्वी ठरले.


यावेळी उपस्थित मान्यवर :

कविता ताई गावंडे, अमोल होले, पंकज वानखेडे, प्रदीप मुंदडा, अनिताताई मेश्राम, नितीन गोंडाने, प्रभाकर वाघ, सुरेश निमकर, नितीन दगडकर, रवी भुतडा, मोहन घुसळीकर, महादेव सामोसे, प्रवीण घुईखेडकर, श्रीकांत गावंडे, चंदू डहाणे, विठ्ठल सपाटे, अविनाश इंगळे,जगदीश आरेकर, गोविंदराव देशमुख, अंजली अग्रवाल, वर्षाताई देशमुख, अशोकराव चौधरी, प्रदीप जगताप, प्रफुल कोकाटे, शिट्टू सूर्यवंशी, धनंजय सेलोकर, श्रीनिवास सूर्यवंशी, प्रफुल माईदे . अतुल चांडक.सनी सावंत, राहुल राहुत, बाळासाहेब देशमुख, गिरीश पोलाड, रितेश शळले, पंकज मेश्राम, सारंग देशमुख, गजू चोरे, भावेश देशमुख, हर्षल वाघ, देवानंद खुणे, सुमेध सरदार, शहजाद सौदागर, सागर भोंडे, पंकज शिंदे, विवेक देशमुख, राजु लांजेवर, अरविंद गुडघे, हर्षा गुडधे, सक्षम वानखेडे, रशीद भाई, पप्पु माने, सागर गरुड, नरेंद्र मेश्राम, संगपाल हरणे,बंटी माकोडे, अवि खुणे, करण मेश्राम,वेदांत श्रीखंडे, वैभव मल्हार, शरद घासले, भीमराव पवार, जीवन शल्के आदी मान्यवर उपस्थित होते.

RS NEWS सक्षम वर बातम्या व जाहिराती करिता संपर्क.9860021481.                     मुख्य संपादक.                                          राजीव शिवणकर 

Post a Comment

0 Comments