Type Here to Get Search Results !

चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२४/२५ ची सर्वसाधारण सभा संपन्न*

 *चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२४/२५ ची सर्वसाधारण सभा संपन्न*



चांदूर रेल्वे (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदूर रेल्वेची सन २०२४-२५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सभेला तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच व प्रतिनिधी तसेच संचालक मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सभेच्या प्रारंभी माजी सभापती प्रदीपभाऊ देविदासजी वाघ यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. हे अनावरण सभापती गणेश आरेकर, उपसभापती रवींद्र देशमुख व संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.



यानंतर बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून समितीच्या सन 2024-25 मधील आर्थिक, व्यवस्थापकीय तसेच कृषी उत्पादन क्षेत्रातील कामकाजाचा सविस्तर आढावा सभागृहासमोर ठेवला.


सभेदरम्यान विद्यमान संचालक व माजी सभापती प्रभाकरराव वाघ यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अधोरेखित केले. त्यांनी शेतकरी हिताच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे ठराव सभागृहासमोर मांडला –

सोयाबीन, तूर, कपाशी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ प्रत्येकी रुपये ५०,०००/- मदत देण्यात यावी.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी.



सदर ठराव बाजार समितीचे संचालक रावसाहेब शेळके यांच्या अनुमोदनासह सर्वानुमते मंजूर करण्यात आला.


कार्यक्रमाचे संचालन अभिजीत देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव चेतन इंगळे यांनी मानले. या वार्षिक सभेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समितीच्या सर्व कर्मचारीवर्गाने सहकार्य केले.


या वार्षिक सभेत मांडण्यात आलेल्या ठरावाद्वारे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी एकमुखी भावना व्यक्त करण्यात आली.


सभेला उपस्थित संचालक मंडळ व सरपंच सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष,राजेंद्र श्रीरामजी राजनेकर, प्रभाकर हरीगोविंद वाघ, रामेश्वर पंढरीनाथजी वानखडे, रावसाहेब हरिनारायणराव शेळके, मंगेश श्रीधरराव धावके, अतुल दयाचंद चांडक, वर्षाताई प्रदीप राव, सौ. पुजाता श्रीनिवासजी देशमुख, वसंत अण्णाजी गाडवे, तेजस हरिभाऊ भेंडे, आशुतोष अमरसिंह गुल्हाणे, हरिभाऊ वसंतराव गवई, प्रशांत बाकेराव कोल्हे, सुभाष मुलचंदजी अग्रवाल, श्यामसुंदर माणिकलालजी पनपालिया, सुरेश नामदेवराव जाधव अरविंद गुडघे , हर्षल वाघ,प्रशांत राऊत,सुधीर नलगे,सचिन झोपाटे,  सुधीर नलगे,

Post a Comment

0 Comments