Type Here to Get Search Results !

मंगरूळ ची मंगलामाता: माहूरचे उपशक्तिपीठ".द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजीं व सर संघचालक मोहनजी भागवत यांनी घेतले दर्शन....

 मंगरूळ ची मंगलामाता: माहूरचे उपशक्तिपीठ".द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजीं व सर संघचालक मोहनजी भागवत यांनी घेतले दर्शन....





धामणगाव रेल्वे,

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तहसिल मध्ये मंगरूळ दत्त हे बारा मुंडाचे गाव असुन या गावात सुंदर व भव्य अनेक मंदिरे आहे. संत महात्म्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या गावाच्या पश्चिमेकडे एक कि.मी. अंतरावर पूर्वाभिमुख भगवती मंगलामातेचे प्राचिन व जागृत स्थान आहे. इसवी सन २००० मध्ये या मंदिराच्या बांधकामाचे जुने झाले असता कौंडण्यपूर येथील शंकराचार्य भागवत महाराज यांनी उद्बोधन करताना " *बाळ,परत ये,मी वाट पाहते* "असे उच्चारले आणि हेच ब्रिदवाक्य पुढे प्रचलित आणि प्रख्यात झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी या ठिकाणी १९४२ आले होते  त्यांना भगवतीचा साक्षात्कार झाला गुरूजींनी हे स्थान जागृत असल्याचे सांगितले होते गोळवळकर गुरुजी यांच्या मंदिरातील साक्षात्कार ८१ वर्षाचा वर्षपूर्ती निमित्त याच वर्षी २४ फेब्रुवारी २०२४ ला वर्तमान सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी सुद्धा मंदिरात येऊन आई मंगला मातेचे दर्शन घेतले


  या गावाला संतांची भुमी आणि मंदीरांचे गाव असेही म्हणतात. संत लहानुजी महाराज व संत गणपती महाराज यांचा जन्म येथेच झाला होता.

श्री. मंगला मातेच्या येथील वास्तव्याबद्दल असे सांगतात की साधारण २०० वर्षापुर्वी येथील कोणी भक्त नवरात्रात माहूर ला रेणुका मातेच्या दर्शनास जात होता. पुढे तो वृध्दावस्थे मुळे  माहूर ला जाऊ शकत नसल्यामुळे तो फार दुःखी झाला. रेणुका माता म्हणाली "तू चिंता करु नकोस मीच तुझ्या गावाला येते." पुढे कोणी सदपुरुष या मार्गे जात असता त्याच्या नित्य पूजेतील श्री रेणुकाई चा तांदळा येथे मंगलधाम परिसरात राहिला. पुढच्या मुक्कामी तांदळा (मुखवटा) नसल्याचे लक्षात आल्यावर तो परत मंगलधाम परिसरात आला असता रेणुकाई ने "मी आता येथेच राहणार असे सांगितले." तो प्रगट दिन चैत्र शु. चतुर्दशीचा होता, तेव्हापासुन आजही चैत्र शु. १४ ला येथे दरवर्षी कुळाचाराचा उत्सव होतो. या मंगलामातेला भवानी माता सुद्धा म्हणतात. हे स्थान माहूर क्षेत्राचे 'उपशक्तीपीठ' असल्यामुळे माहूरच्या रेणुकाई ला केलेला नवस येथे सुद्धा फेडतात. 

ही मंगला माता अनेक घराण्यांची कुलदेवता आहे. मध्यंतरी काही काळ हे स्थान दुर्लक्षित होते. 

प.पू. स्वामी शिलानंद सरस्वती हे  संन्यास घेतल्यानंतर साधना करण्याकरिता माहूर वरून स्थान शोधत  मंगरूळ ला आले.

देवी भागवतातील नवम स्कंधात 'मंगलचंडी'  नावाने श्री मंगलामातेचा उल्लेख आहे. भक्तांचे मंगल करण्याकरिता जी तत्पर आहे ती 'मंगलचंडी' फार पूर्वी मंगल नावाच्या राजाने प्रकृती अंश सावित्रीदेवीची उपासना केली. 

राजाच्या विनंतीने देवी सावित्रीच त्याचे घरी कन्या रूपाने प्रकट झाली म्हणुन तिचे नाव मंगंलादेवी असे ठेवले. 'मंगलांधयति इति मंगला' जन्म मृत्यरुप दुःखातून जी भक्तांना तारते ती मंगला. ही मंगला देवी मंगळ ग्रहाची अधिष्ठात्री आहे. हिच्या उपासनेने मंगळ ग्रहाचे दोष नाहीसे होतात. मंगला देवीच्या उपासनेने  विवाह आदी कार्ये लवकर होत असल्याचा अनेक भक्तांचा अनुभव आहे. मंगळागौरी चे व्रत हिच्याच नावाने करतात. मंगलादेवी चे स्थान भारतात दोनच ठिकाणी आहे. एक काशी क्षेत्री मंगलागौरी व दुसरे मंगरूळ दत्त ला.

मंगरूळच्या मंगला माता देवस्थानचे व्यवस्थापन व सेवा अध्यक्ष प्रभाकर खानजोडे,उपाध्यक्ष दिवाकर देशपांडे,सचिव रवींद्र देशपांडे, सह सचिव प्रशांत शेटे कोषाध्यक्ष राजेश सोनी,विश्वस्त जुगलकिशोर मुंदडा, प्रदीप फडणवीस,शरदचंद्र देशपांडे सह मुख्य पुजारी मोहन देव,व्यवस्थापक विवेक देव, भूषण पिंपळे, सुदाम जांभुरे व देवीचे परमभक्त वैभव पोतदार मंदिराचे प्रसिद्धी प्रमुख हे प्रचार व प्रसाराचे चे कार्य प्रामुख्याने पाहतात



Post a Comment

0 Comments