Type Here to Get Search Results !

चांदूर रेल्वे शहरातील प्राचीन जगदंबा माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धा स्थान*आकर्षक रोषणाईने परिसर सजवला.शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान विविध पूजा विधी*मंदिरात पहिल्या वर्षी अखंड दीपोत्सवा आठवड्यात १०७ दिवे लावण्यात आले*दीपोत्सवाचे उद्घाटन खासदार अमर काळे आणि सदस्य प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आले*

 चांदूर रेल्वे शहरातील प्राचीन जगदंबा माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धा स्थान*आकर्षक रोषणाईने परिसर सजवला.शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान विविध पूजा विधी*मंदिरात पहिल्या वर्षी अखंड दीपोत्सवा आठवड्यात १०७ दिवे लावण्यात आले*दीपोत्सवाचे उद्घाटन खासदार अमर काळे आणि सदस्य प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आले*



चांदूर रेल्वे प्रतिनिधी


 चांदूर रेल्वे शहरातील प्राचीन जगदंबा माता मंदिर हे शक्तीपीठ आहे आणि म्हणूनच हजारो शह्ररवासियाचे  हे मंदिर श्रद्धा स्थान म्हणूंन प्रसिद्ध आहे. ह्या प्राचीन मंदिरात जगदंबा मातेची ४०० वर्ष जुनी स्वयंभू मूर्ती स्थापित आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.नवरात्रोत्सवादरम्यान मंदिरात दर्शन घेण्यासाठी दररोज सकाळ सायंकाळ शेकडो भाविकांची गर्दी जमते. सर्व भाविक मंदिरात शाश्वत ज्योत प्रज्वलित करतात. या वेळी नवरात्रीतील दीपोत्सवाच्या पहिल्या वर्षीच १०७ शाश्वत दिव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान आमदार प्रताप अडसड  आणि खासदार अमर काळे यांच्या हस्ते शाश्वत दिपक प्रज्वलित करून या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मंदिराचे  अध्यक्ष सचिन वर्मा सांगितले की, ही परंपरा दरवर्षी सुरू राहील.



 @मंदिरासाठी 'ब 'श्रेणीची मागणी*


जगदंबा माता मंदिर हे ४०० वर्षे पुरातन देवस्थान आहे आणि भाविकांचे इथे अपार  श्रद्धा आहे. मंदिरात वर्षभर आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, म्हणूनच मोठ्या संख्येने भाविक ह्या ठिकाणी आपली हजेरी लावतात. देवस्थानात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने, रहिवासी मंदिरासाठी विश्वस्त मंडळ शासनसकडे  'ब' श्रेणीची मागणी करत आहेत.


@सकाळ आणि संध्याकाळ महाआरती आणि १ ऑक्टोबर रोजी भव्य महाप्रसाद*


नवरात्रीदरम्यान दररोज सकाळ आणि संध्याकाळ महाआरतीमध्ये हजारो भाविक सहभागी होतात. गावातील पुजारी पंडित सीताराम दुबे हे दैनंदिन पूजा - पाठ  दररोज आणि महाआरती करतात.



दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रीदरम्यान बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी भव्य महाप्रसादाचे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. मंदिराचे अध्यक्ष सचिन वर्मा तसेच विश्वस्त मंडळ यांनी शहरातील तसेच आजू बाजूच्या. गावातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  केले आहे.


Post a Comment

0 Comments