*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा*
अमरावती, --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरूवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.40 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. दुपारी 1.30 वाजता कॅम्प रोड येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, अमरावतीच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 1.50 वाजता सांस्कृतिक भवन येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, अमरावतीच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता अमरावती-मार्डी रस्ता येथील दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.55 वाजता अमरावती विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करिता संपर्क -9860021481 मुख्य संपादक राजीव शिवणकर

Post a Comment
0 Comments