राज्यस्तरीय भव्य दिव्य गुणगौरव सोहळा, दसरा मिलन व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम २०२५
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व खेळाडू क्षेत्रातील तसेच स्पर्धा परीक्षांतील उल्लेखनीय कामगिरीस गौरविण्यासाठी भव्य राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, दसरा मिलन व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक – ५ ऑक्टोबर २०२५, रविवार
वेळ – सकाळी १०:०० वा.
स्थळ – हर्ष मंगलम कार्यालय, संताजी नगर जवळ, हरी गंगा तेल घाणी जवळ, शंकर नगर परिसर, अमरावती
उद्देश:
समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रांत केलेल्या प्राविण्यपूर्ण कामगिरीचा गौरव करून त्यांना प्रेरणा देणे व युवकांना मार्गदर्शन करणे.
गौरवासाठी पात्रता निकष : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये
दहावी (SSC) – किमान ७५%
बारावी (HSC) – किमान ७०%
डिप्लोमा / पदवी (Degree) – किमान ६५%
CET – ९० Percentile वरील
NEET – ४०० गुणांवरील
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे
क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त त्यापुढील यश प्राप्त करणारे
शासकीय सेवेत निवड झालेले समाज बांधव मेडल/पुरस्कार मिळवणारे
नोंदणीसाठी आवाहन:
सर्व समाज बांधवांनी आपल्या व आपल्या परिवारातील पात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका / सर्टिफिकेट्स कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी खालील क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवाव्यात:
नोंदणीची शेवटची तारीख : ०३ ऑक्टोबर २०२५
संपर्क: प्रा. स्वप्निल विनोदराव खेडकर
मो.: 9158587230
RS NEWS सक्षम महाराष्ट्र. यावर बातम्या व जाहिराती करिता संपर्क. 9860021481. मुख्य संपादक. राजीव शिवणकर



Post a Comment
0 Comments