सावंगपूर नगरीत दिपावली निमित्त चंदनउटी उत्सव
अखंड नामस्मरणात भक्तांची मांदीयाळी!
चांदूर रेल्वे :-
“चला जाऊ सावंगपुरी, गडे हो भक्तांचे माहेरी... तिथे नांदतो हरी, हेच होय पुण्याची पायरी!”
या भक्तिभावाने ओथंबलेल्या ओवीने दिपावलीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत चंदन उटी उत्सव पार पडणार आहे.
श्री विठोबा संस्थानच्या वतीने नेहमीप्रमाणे यावेळी ही दिपावली-अमावस्या निमित्त विशेष "चंदनउटी उत्सव" उत्साहात साजरा होत आहे.दि.२१ऑक्टोबर २०२५ मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता या पवित्र सोहळ्याची सुरुवात होणार असून अवधूती भजन आणि अखंड अवधूत नामस्मरण याने संपूर्ण परिसर गजरमय होणार आहे.
भक्तांच्या माहेरी म्हणविणाऱ्या सावंगपूर नगरीत भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, दुपारी २ वाजता बाहेरगावहून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
विश्वस्त मंडळाने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, या पवित्र सोहळ्यात तन-मन-धनाने सहभागी होऊन भक्तीचा आनंद लुटावा.
श्री विठोबा संस्थानच्या वतीने सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, “ही दिवाळी सर्वांना सुख, समृद्धी आणि अध्यात्मिक प्रकाश देणारी ठरो,” अशी प्रार्थना श्री अवधूत महाराज यांच्या चरणी करण्यात आली आहे.
संस्थानचे वतीने महाराजांच्या प्रेरणेने या ठिकाणी भाविकांना रात्रीचे निवासाकरिता धर्मशाळा सह भक्तनिवास (सर्व सुविधा सह पाच मजली इमारत) बांधकामाचा शुभारंभ अगदी थोड्याच दिवसात होत आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी आदींनी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने केले आहे. RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करता संपर्क मुख्य संपादक राजीव शिवणकर मो.9860021481

Post a Comment
0 Comments