अनुसूचित जातीच्या युवकांसाठी बार्टी पुरस्कृत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अर्ज सादर करण्याची मुदत 6 नोव्हेंबर*
अमरावती,-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या विशेष प्रोत्साहन योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी एक महिन्याच्या नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणादरम्यान उद्योजकीय विकास, उद्योगाची निवड, प्रकल्प अहवाल निर्मिती, मार्केटिंग, विविध शासकीय योजना, कर्जपुरवठा, डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 8 वी उत्तीर्ण असून, वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे. पदवी, पदविका किंवा आयटीआय झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
परिचय मेळावा व मुलाखत दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), टांक चेम्बर्स बिल्डिंग, गाडगेनगर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांनी दि. 6 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत त्वरित नोंदणी करावी. मुलाखतीला येतांना तीन फोटो, मूळ शैक्षणिक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प अधिकारी अनिता गवई, तसेच प्रकल्प अधिकारी राजेश सुने (मो. 8788604226, 9168667154) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करिता संपर्क 9860021481 मुख्य संपादक राजीव शिवनकर

Post a Comment
0 Comments