श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त चंदनउटी व रमणा उत्सव विशेष कार्यक्रम:भविकांकरिता भव्य महाप्रसाद, कार्तिक मास मांड वाढवा सोहळा
चांदूर रेल्वे (प्रतिनिधी):-
तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानतर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त चंदनउटी व रमणा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या धार्मिक सोहळ्याची भक्तांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या उत्सवाचे आयोजन दि. ५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) रोजी करण्यात आले असून, कार्यक्रमाची सुरुवात सायं. ४ वाजता चंदन उटी व रमणा सोहळ्याने होणार आहे. दुपारपासूनच भाविकांची गर्दी सावंगा विठोबा मंदिर परिसरात होण्यास सुरुवात होईल. संध्याकाळी ६ वाजता कार्तिक मास काकडा समाप्ती भजनाचे गजरात पार पडेल. त्यानंतर सायं. ७ वाजता भाविक भक्त आणि समस्त ग्रामवासियांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचे दाते अनिल भानाजी राऊत (नागपूर) यांचे संपूर्ण स्वखर्चाने आणि अन्नदान समितीचे नियोजनात होत आहे.
याचबरोबर दि. ६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ९ वाजता कार्तिक मास वाढवा कार्यक्रम पार पडणार आहे. या दिवशी सकाळपासूनच अवधूत नामस्मरण, भजन, आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमात भाविक भक्तांनी आणि ग्रामस्थांनी तन-मन-धनाने सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री विठोबा संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी तसेच समस्त विश्वस्त मंडळा तर्फे करण्यात आले आहे. RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करता संपर्क 9860021481 मुख्य संपादक राजीव शिवणकर

Post a Comment
0 Comments