शहराच्या विकासाकरिता भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला व सदस्याना निवडून आणा महसूल मंत्री बावनकुळे,
चांदुर रेल्वे /सुमेध सरदार. शहरातून भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोबतच नगर सेवक पदाची उमेदवारांना मतभेद न करता एक जुटीने काम करून निवडून आणण्याचे संकल्प करा असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केले,
यावेळी ते बोलताना म्हणाले की राज्यात शासनाच्या वतीने 124 योजना अमलात येणार आहे, नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक म्हणजे मोदी आणि फडणीस साहेबांचे हात बळकट करण्याची निवडणूक आहे,येणाऱ्या पाच वर्षात राज्यातील एकही पांदन रस्ते शिल्लक राहणार नाही, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे शहराच्या विकासाकरिता नगराध्यक्ष सुद्धा भाजपाचा असावा जेणेकरून शहराचा विकास होईल, विकासाच्या गाडीचा चौथा चाक म्हणजे नगर अध्यक्ष असतो असे सुद्धा तर यावेळी बोलताना म्हणाले,
यावेळी धामणगाव विधान सभाचे आमदार प्रताप अडसड म्हणाले की मागील पंधरा वर्षात शहराचा विकास झाला नाही यावेळी मी आमदार असताना शहरात पिण्याच्या पाण्या करिता अमृत योजना आणल्याचा उल्लेख देखील केला, नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाची उमेदवारी हे प्रत्येक कार्यकर्त्याला पक्ष देऊ शकत नाही पण यावेळी कोणत्याही कार्यकर्त्यांनी तिकीट न मिळण्याचा राग मनात न बाळगता पक्षा करिता काम करावे अशी भावनिक विनंती सुद्धा प्रताप अडसड यांनी कार्यकर्त्यांना केली, शहराच्या विकासाकरिता ही एक चांगली संधी आहे यावेळी कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहून पक्षाच्या उमेदवाराचे काम करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले,
कार्यक्रमाची प्रस्तावना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय हजारे यांनी केले यावेळी मंचावर खासदार अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख तालुका अध्यक्ष विवेक चौधरी, धीरेंद्र खेरडे,वासुदेव मानकानि, संदीप सोळंके,बंडू भुते पप्पू गुल्हाने,शहराध्यक्ष नंदा वाध वाणी, दर्शन राठी विठ्ठल राजनेकर रामदास निस्ताने, उत्तमराव ठाकरे, सविता ठाकरे, हे विराजमान होते,या कार्यकर्ता मेळावा करिता,पप्पू भालेराव, सचिन जयस्वाल अनिल मोटवानी विलास तांडेकर, विजय मिसाळ प्राविण्य देशमुख रोशन खेरडे बाळासाहेब स्वर्गीकर योगेश बजाज, प्रतीक राय पवन ठाकूर रोशन कापसे रवींद्र उपाध्य, महिलां मध्ये स्वाती मेटे, सुषमाताई खंडार, अपर्णा जगताप, रंजीता ठाकरे दिपाली मिसाळ सुरेखा दांडेकर सुषमा पातूडे, दुर्गा भूत आचल प्रधान, या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी अनेक महिला व पुरुष आदी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते




Post a Comment
0 Comments