Type Here to Get Search Results !

न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष मैदानात!चांदूर रेल्वेत 10 नोव्हेंबरला भव्य कार्यकर्ता मेळावादिल्लीच्या आमदार व माजी मंत्री राखी बिर्ला राहणार उपस्थितपत्रकार परिषदेतून नम्रता नितीन गवळी यांनी दिली माहिती

 न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष मैदानात!चांदूर रेल्वेत 10 नोव्हेंबरला भव्य कार्यकर्ता मेळावादिल्लीच्या आमदार व माजी मंत्री राखी बिर्ला राहणार उपस्थितपत्रकार परिषदेतून नम्रता नितीन गवळी यांनी दिली माहिती



चांदूर रेल्वे :- (ता. प्र.)


आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आता चांदूर रेल्वे शहराच्या विकासासाठी मैदानात उतरला आहे. यासंदर्भात दिल्लीच्या आमदार व माजी मंत्री राखी बिर्ला यांच्या उपस्थितीत १॰ नोव्हेंबरला भव्य कार्यकर्ता मेळावा चांदूर रेल्वेतील संताबाई यादव मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेतून नम्रता नितीन गवळी यांनी शनिवारी दिली. 



“आम आदमी पक्ष राजकारणासाठी नव्हे, तर स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचे प्रशासन देण्यासाठी कार्यरत आहे. दिल्लीच्या विकासाच्या धर्तीवर चांदूर रेल्वेचा सर्वांगीण विकास हा आमचा उद्देश आहे असेही नम्रता गवळी यांनी यावेळी म्हटले. नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीचा शुभारंभ म्हणून सोमवारी, १॰ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता संताबाई यादव मंगल कार्यालय, चांदूर रेल्वे येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला दिल्लीच्या आमदार व माजी उपसभापती राखी बिर्ला प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्या दिल्ली सरकारच्या माजी कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने पारदर्शक आणि जनहितकारी प्रशासनाचे नवे उदाहरण घालून दिले आहे. “चांदूर रेल्वेच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे,” असे आवाहन आम आदमी पार्टीच्या नम्रता नितीन गवळी, आप नेते नितीन गवळी, मेहमुद हुसैन, शहर संयोजक मंगेश डाफ, तालुका संयोजक सागर गावंडे, कार्यकर्ते चरण जोल्हे, प्रशांत गावंडे, विनोद लहाणे, निलेश कापसे, सचिन ठवकर आदींनी केले आहे. आम आदमी पक्ष चांदूर रेल्वे शहरासाठी खड्डेमुक्त रस्ते, सिमेंट रोड, फूटपाथ व लाईट व्यवस्था, दररोज शुद्ध पाणी, घनकचरा प्रकल्प, नियमित कचरा संकलन, प्रकाशमान रस्ते व संपुर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, उर्दू माध्यमाचे ११वी-१२वीचे महाविद्यालय, युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र, ग्रामिण रूग्णालयात डॉक्टर व औषधांची उपलब्धता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, नगर परिषदेत पारदर्शक निविदा प्रक्रिया यांसह विविध जनहित व भावनिक मुद्दे घेऊन नगर परिषदेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच सर्वच जागा लढविणार असल्याचेही सांगितले.


Post a Comment

0 Comments