भव्य महिला मेळावा : चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिलांना सक्षमीकरणाचा संदेश
धामणगांव रेल्वे – भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी चित्रा वाघ यांनी महिलांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेली पुढाकार, उज्ज्वला, मातृवंदना, बेटी बचाओ—बेटी पढाओ यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेद्वारे महिलांना मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरपरिषद धामणगाव रेल्वे येथील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेचा उत्साह पाहता, नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार डॉ. अर्चना अडसड रोठे (आक्का) यांचे विशेष कौतुक करण्यात आले. अर्चना आक्का नगरपरिषद क्षेत्रातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, महिलांसाठी सुरक्षितता अशा अनेक मूलभूत समस्यांवर निर्भीडपणे काम करून महत्त्वाकांक्षी योजना राबवणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमात सर्व पॅनल उमेदवारांना विजयी करून अर्चना आक्का यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटचालीला गती देण्याचे आवाहन करण्यात आले. धामणगांवचा सर्वांगीण विकास हवा असल्यास अर्चना अडसड रोठे व त्यांच्या पॅनलला निवडून देणे अत्यावश्यक असल्याचेही यावेळी सांगितले गेले.
विरोधक केवळ टीका करतात, मात्र त्यांच्या टीका निराधार व फालतू असल्याचेही भाषणात नमूद करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड यांची विशेष उपस्थिती होती. शहर व परिसरातील विविध भागांतून महिला मोठ्या संख्येने दाखल झाल्याने मेळावा उत्साहात पार पडला.
RS NEWS सक्षम महाराष्ट्र वाघमारे धामणगांव रेल्वे




Post a Comment
0 Comments