Type Here to Get Search Results !

दिल्लीमध्ये आज गिरोळकर परिवाराचा राष्ट्रीय सन्मानराष्ट्रीय संविधान सन्मान दिवस समारंभात होणार गौरव

 दिल्लीमध्ये आज गिरोळकर परिवाराचा राष्ट्रीय सन्मानराष्ट्रीय संविधान सन्मान दिवस समारंभात होणार गौरव



 प्रतिनिधी व, २४ नोव्हेंबर अमरावती. कोरोना काळात गोर-गरीबांची अखंड सेवा करणारे आणि सर्वधर्म समभावाचा प्रभावी संदेश देणाऱ्या मराठी चित्रपट "सुल्तान, शंभू, सुबेदार" निर्मितीसाठी अमरावतीचे युवा उद्योजक कैलास गिरोळकर, सौ. छाया गिरोळकर आणि अभिनेता यश गिरोळकर यांना आज, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीमध्ये राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे डॉ. मनीष गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सन्मान महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.


याचप्रमाणे, २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात आयोजित राष्ट्रीय संविधान सन्मान दिवस कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय सन्मान करण्यात येणार आहे.



या मान्यवरांना राष्ट्रपती भवन दर्शनाची सुवर्णसंधी देखील मिळणार असून, अमरावतीकरांसाठी हा दुहेरी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments