जप तप ध्यान साधना केल्याने मन शांत राहते,श्रीजी म सा, अरुण प्रभा जी जैन स्थानक चांदुर रेल्वे येथे महामंगलिक कार्यक्रमाचे आयोजन,
चांदुर रेल्वे / श्रवणसंघीय उपप्रवर्तिनी आयबिल तप आराधीका पूज्य श्री अरुणप्रभा श्री जी म सा यांचा चांदुर रेल्वे शहरात ता 3 रोजी शहरातील जैनस्थानात येथे आगमन झाले, दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांनी जैन समाजातील महिला व पुरुषांना अनेक प्रवचन केले, यावेळी त्यांनी सांगितलं की जप तप व ध्यान साधना केल्या पाहिजे, तर मौन साधना केल्याने मन शांत राहते तपस्य केल्याने शरीर स्वस्त राहते, जिओ और जिने दो चा संदेश देणारे जैन समाजाचे उद्धववाक्य आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही लहान मोठ्या जीवांना हानी पोहोचू नये, असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले, ता 4 रोजी सकाळी नऊ वाजता पैसठिया यंत्राचा जाप सोबतच पुनम की बडीमांगलिक झाली हा कार्यक्रम ऐकण्याकरिता नागपूर यवतमाळ हिंगणघाट धामणगाव अमरावती बडनेरा येथील अनेक जैन समाजाचे नागरिक व महिला यावेळी आले होते,
यावेळी धामणगाव चांदुर रेल्वे येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना रोठे व स्वाती मेटे यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,)

Post a Comment
0 Comments