डॉ. अशोक मधुकरराव तायडे यांना काशी हिंदी विद्यापीठाचा ‘विद्या-वाचस्पति’ मानद सन्मान
चांदूर रेल्वे - (ता. प्र.)
हिंदी भाषा, साहित्य, कला, शैक्षणिक क्षेत्र तसेच संशोधन कार्यामध्ये उल्लेखनीय आणि दीर्घकालीन योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अमरावती विभागीय सरचिटणीस तसेच कास्ट्राईब शिक्षक आघाडीचे अमरावती विभागीय कार्याध्यक्ष, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूलमधील हिंदीचे शिक्षक डॉ. अशोक मधुकरराव तायडे यांना काशी हिंदी विद्यापीठ, पाण्डेयपुर-वाराणसी तर्फे ‘विद्या-वाचस्पति’ (पीएचडी समतुल्य) मानद सन्मान प्रदान करण्यात आला.
विद्यापीठाच्या अकादमिक परिषदेमार्फत डॉ. अशोक तायडे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. हिंदी सेवेतला त्यांचा दीर्घ प्रवास, सारस्वत साधना, कला क्षेत्रातील उल्लेखनीय कर्तृत्व, शैक्षणिक प्रदेय, संशोधनात्मक कामगिरी आणि समाजकार्यातील योगदान पाहता हा मानाचा सन्मान देण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले. डॉ. तायडे यांच्या या सन्मानामुळे अमरावती विभागासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments