जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने चांदूर रेल्वे शहर दुमदूमले२१ फेब्रुवारी ला प्रा. प्रविण देशमुख यांचे शिव व्याख्यान
तालूका प्रतिनिधी/
चांदूर रेल्वे-
शिव, शाहू, फुले, आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी सकाळी चांदूर रेल्वे येथील काँग्रेस कार्यालयापासून हजारो शिवभक्तांनी भगवा फेटा घालून शहराच्या विविध मार्गांमधून भव्य दिव्य बाइक रॅली आणि शोभायात्रा काढली. यावेळी जय भवानी जय शिवाजी या जयघोषांनी संपूर्ण चांदूर रेल्वे शहर दूमदूूमले होते.
स्थानिक रेल्वे स्टेशन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळयाचे पूजन करून माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी विनम्र अभिवादन केले.
त्यानंतर नगर पालिका प्रांगणतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.सिनेमा चौकात चंद्रशेखर आजाद यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी डाॅ.सागर वाघ यांच्यासह शिव, शाहू, फुले, आंबेडकर जयंती समितीचे रार्व पदाधिकारी व सदस्य तसेच काॅग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२१ फेब्रुवारी ला प्रा. प्रविण देशमुख यांचे जाहिर शिव व्याख्यान
शिव,शाहू,फुले,आंबेडकर जयंती उत्सव समिती,चांदूर रेल्वे यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव निमित्त शनिवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल च्या प्रांगणात प्रसिध्द शिव व्याख्याते प्रा.प्रविण देशमुख यांचे
शिव व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या जाहिर व्याख्यानाला चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व जनतेने हजेरी लावून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment
0 Comments