Type Here to Get Search Results !

चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथे भागवत कथा चे आयोजन कलश यात्रा राहणार आकर्षणाचे केंद्र,

 चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथे भागवत कथा चे आयोजन कलश यात्रा राहणार आकर्षणाचे केंद्र,



चांदुर रेल्वे / शहरातील चारशे वर्ष जुने चंद्रभागेश्वर देवस्थान येथे आज ता 9 ते 15 फेब्रुवारी पर्यंत ह भ प देवी राधिके (वृंदावन धाम)यांच्या अमृत तुल्य वाणीतून भागवत कथेचे आयोजन होणार असून आज शहरातील गणपती मंदिरातून भव्य कलश यात्रा निघणार आहे ही कलश यात्रा शहरातील अनेक भागात फिरणार असून या कलाश यात्रे मध्ये तालुक्यातील अनेक भजन मंडल,दिंड्या,चा सहभागी राहणार आहे,अशी माहिती देवस्थानाचे वतीने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली 



 शहरातील चंद्रभागेच्या देवस्थान येथे ता 9 ते 15 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 06 वा काकडा आरती,हरिपाठ, होणार असून दुपारी दोन ते पाच वाजे पर्यंत कथावाचक ह भ प देवी राधिके श्री वृंदावन धाम यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा होणार आहे,


या व्यतिरिक्त दररोज सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत शहरातील अनेक भजन मंडळ देवस्थान येथे आपली भजने सादर करणार आहे,तर ता 12 गुरुवार रोजी बाल वारकरी बालाजी मंडळ(राजुरा) येथील भूषण काळे यांचे तालसुरावर हरिपाठ पावली व गोंधळ चा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले,ता 15 रविवार रोजी देवस्थानचे अध्यक्ष कैलास गिरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 15 अपंग लोकांना कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात येणार आहे, ता 16 सोमवार रोजी भागवत कथेच्या समाप्ती होणार असून यावेळी सामूहिक शिवपूजा चे आयोजन झाल्यानंतर गोपाल काला व काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे, महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या या भागवत कथा व कळस यात्रेत सहभागी होण्याची आव्हान देवस्थानचे अध्यक्ष  कैलास गिरोडकर,सुनील अग्रवाल,नगरसेवक बच्चू वानरे, गजू ठाकरे,निलेश गुल्हाने, डॉ प्रशांत कुठे काठेकर, यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments