Type Here to Get Search Results !

पत्रकारांसाठी गुरूवारी विशेष मोफत आरोग्य शिबिर*आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा*

 *पत्रकारांसाठी गुरूवारी विशेष मोफत आरोग्य शिबिर*आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा*


        अमरावती, दि. 3 (जिमाका): पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी अमरावती जिल्हा पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, प्रसारमाध्यम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिबिर पूर्णतः मोफत असणार आहे.

      या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना विविध तपासण्यांची सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे. आरोग्यविषयक चाचण्यांमध्ये संपूर्ण रक्त तपासणीसाठी लिपीड टेस्ट, फुल बॉडी चेकअप, नेत्र तपासणी आणि दंत चिकित्सा यांचा समावेश आहे. याठिकाणी केवळ तपासणीच नाही, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासोबतच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरात 'आयुष्मान कार्ड' काढण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रकारांनी आपले रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे.

     जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या कुटुंबासह याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ९०२८६५५५५९, ९८२२४९६९७२ किंवा ९८८११०२०८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments