Type Here to Get Search Results !

अ.भा.ग्रा पत्रकार संघ महिला मंच चे आयोजन. कांचन रिसॉर्ट येथे होणार कर्तुत्ववान महिलांचा सत्कार,गायन, नृत्य, व्याख्यानाने रंगणार सोहळा.

 10 मार्च रोजी महिला दिन होणार साजरा

 अ.भा.ग्रा पत्रकार संघ महिला मंच चे आयोजन. कांचन रिसॉर्ट येथे होणार कर्तुत्ववान महिलांचा सत्कार,गायन, नृत्य, व्याख्यानाने रंगणार सोहळा


- अमरावती - (प्रतिनिधी)अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अमरावतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शहरातील कांचन रिसॉर्ट येथे सकाळी ११ वाजता  करण्यात आले आहे.कार्यक्रमात महिलांवर आधारीत गीत गायन,नृत्य,कावितेचे सादरीकरण होणार असून  कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.शोभना देशमुख भारतीय जनता पार्टी सदस्या,विशेष उपस्थिती मा.आ.सुलभाताई खोडके,प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रिती देशमुख (प्रकल्प संचालक )जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, - DRDA), डाॅ.अनुभूती पाटील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ,सुरेखा लुंगारे नगरसेविका, राजश्री जढाळे (संचालक) महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अम,अक्षरा लहाने महिला मंच पश्चिम विदर्भ कार्याध्यक्षा अचलपूर,मनोहर सुने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष तसेच केंद्रीय अध्यक्ष, युसुफभाई खान केंद्रीय कार्याध्यक्ष, कैलासबापू देशमुख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांची उपस्थिती राहणार आहे.


यावेळी कार्यक्रमात डॉ. माया बोरखडे आयुर्वेदाचार्या,हर्षा ढोक क्रीडा क्षेत्र, कांता काळे आरोग्य सेवा,कहुता घाटोळ उद्योग क्षेत्र, श्रुतिका तायडे उद्योजक, कांचन उल्हे उद्योग क्षेत्र, कविता बोंडे समुपदेशिका, मीना राहिंज पत्रकारिता क्षेत्र, वैशाली बरडे स्वयंरोजगार व उद्योग, आदिती मेहता नृत्यकला, गौरी सतके गायन, डॉ. प्राचार्या मंजुषा सागर वडकी शिक्षण क्षेत्र, सुयोगा संतापे लेखन, या विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अमरावती यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments