Type Here to Get Search Results !

चौथा स्तंभ’ मजबूत करण्यासाठी अ.भा.ग्रा. पत्रकार संघाची आमदारांना साद,पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन आ. प्रताप अडसड यांना सादर

 ‘चौथा स्तंभ’ मजबूत करण्या


साठी अ.भा.ग्रा. पत्रकार संघाची आमदारांना साद,पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन आ. प्रताप अडसड यांना सादर


चांदूर रेल्वे - (ता. प्र.)


पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने रविवारी अमरावतीत जोरदार पुढाकार घेतला. संघाच्या शिष्टमंडळाने धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची भेट घेत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया चे पत्रकार व संबंधित कर्मचारी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. या भेटीत आमदार प्रताप अडसड यांनी पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्या प्राधान्याने सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत राहण्यासाठी पत्रकारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


अ.भा.ग्रा. पत्रकार संघटनेने सादर केलेल्या निवेदनात पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र पत्रकार महामंडळ व वृत्तपत्र विक्रेता महामंडळ स्थापन करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावर पत्रकार भवन उभारण्याची मागणीही करण्यात आली. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रात काम करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे या क्षेत्रातील सर्व घटकांना संस्थात्मक आधार मिळावा, अशी संघाची भूमिका आहे. १९९६ पासून जनसामान्यांच्या सेवेसोबत पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, राष्ट्रीय नियोजन समिती अध्यक्ष सुरेश सवळे, राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, राष्ट्रीय चिटणीस अशोक पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप जोशी, रविंद्र मेंढे, महिला मंच प्रदेशाध्यक्ष कांचन मुरके, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे, संतोष वाघमारे, तसेच तालुका सचिव राजीव शिवणकर यांसह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांना नवे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments