Type Here to Get Search Results !

सावंगा (विठोबा) नगरीत वैशाख अमावस्या निमित्त चंदन उटी उत्सव व अधिक ज्येष्ठ मास भजन मांड कार्यक्रमाचा शुभारंभ

 सावंगा (विठोबा) नगरीत वैशाख अमावस्या निमित्त चंदन उटी उत्सव व अधिक ज्येष्ठ मास भजन मांड कार्यक्रमाचा शुभारंभ



चांदूर रेल्वे (प्रतिनिधी):- अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे वैशाख अमावस्या निमित्त चंदन उटी उत्सव तसेच अधिक ज्येष्ठ मास अखंड जागृती भजन मांड कार्यक्रमाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.

श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान यांच्या वतीने दि. १६ मे २०२६, शनिवार रोजी दुपारी ५.०० वाजता संस्थान परिसरात भक्तिभावपूर्ण वातावरणात चंदन उटी उत्सव संपन्न होणार आहे. या प्रसंगी चंदनउटी नंतर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन संस्थानच्या अन्नदान समितीमार्फत करण्यात आले आहे.

याच दिवशी पहाटे ५.०० वाजता संस्थानतर्फे अधिक ज्येष्ठ मास निमित्त आयोजित अखंड जागृती भजन मांड कार्यक्रमाचा शुभारंभ लहान मंदिरात ढाल बसवून होणार असून,मुख्य मंदिरात कृष्णाजी महाराजांचे गण सुमरनाने विश्वस्त मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत  भजनाचा गजर सुरू होईल.शनिवार दि.१६ मे २९२६ ते सोमवार दि.१५ जून २०२६ या कालावधीत अधिक ज्येष्ठ मास भजन मांडीचे आयोजन करण्यात आले आहे. या मांडीत दैनंदिन  सहभागी अवधूत भजन मंडळाची संस्थान तर्फे दैनंदिन भोजन,चहा व नास्ता इ.व्यवस्था करण्यात आली आहे आणि सहभागी मंडळांना महाराजांची गाथा,संस्थानची टोपी व सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.या मांडीत महाराजांच्या सेवे प्रती निस्वार्थ भावनेने व सेवाभावी वृत्तीने कार्य केले आहे अशा भाविकांचा संस्थान तर्फे सत्कार करण्यात येणार आहे. 

भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नियमित बससेवा उपलब्ध आहे.

चांदूर रेल्वे बसस्थानकातून: सकाळी ९.००, १०.००, दुपारी ३.०० व सायंकाळी ७.१५

अमरावती बसस्थानकातून: सकाळी ७.३० व सायंकाळी ५.४५भाविकांनी अवैध वाहनांचा वापर टाळून अधिकृत बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन मन धनाने सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त विनायक पाटील, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments