*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, अमरावती (पूर्व)* जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रभाकर भगोले .तर जिल्हा सरचिटनीस पदी निशिकांत देशमुख चांदुर रेल्वे, यांची वर्णी सर्व स्तरावरून शुभेच्छा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (ऑल इंडिया) अमरावती जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली आहे. यावेळी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन अर्पण केले.
धामणगांव रेल्वे येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
बैठकीत पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसह ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे .त्यानंतर सर्वानुमते अमरावती जिल्हा (पूर्व) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, होते तर प्रमुख अतिथी राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, राष्ट्रीय चिटणीस अशोक पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप जोशी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश संघटक दिनेश भटकर, हे उपस्थित होते. बैठकीचे नियोजनअमरावती (पूर्व) जिल्हाध्यक्ष संतोष वाघमारे यांनी केले होते बैठकीला उपस्थित चांदूर रेल्वे तालुका सचिव राजीव शिवणकर यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अमरावती जिल्हा (पूर्व) कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
जिल्हाध्यक्ष संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश ठाकरे वरुड,जिल्हा उपाध्यक्ष धनराज बारबुद्धे गुरुकुंज तिवसा ,जिल्हा उपाध्यक्ष कैलास ठाकूर सावरखेड मोर्शी,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भगोले चांदुर रेल्वे,जिल्हा सलचिटनीस निशिकांत देशमुख चांदुर रेल्वे, जिल्हा सरचिटणीस निलेश रामगावकर
जिल्हा संघटक अश्विन हरिदास सिनकर अंबाडा मोर्शी,
जिल्हा संघटक शेख शाहरुख शेख रजाक कुऱ्हा, जिल्हा सदस्य वासुदेव गावंडे शिवनी रसूलपुर, ज्ञानेश्वर बेलूरकर वरखेड तिवसा,
बैठकीदरम्यान संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचवण्याचा तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे .नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेले जाईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राजीक बेग समशेर बेग, धीरज भौसारे, मनोज साफेकर, शेख शाकीर अहमद सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments