ज्येष्ठ गुरुदेव भक्त श्री जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील श्री गुरुकुंज आश्रम, मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अखंड वाहक आणि ज्येष्ठ गुरुदेव भक्त श्री जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सहवास लाभलेल्या बोथे गुरुजी यांनी समाजप्रबोधन, ग्रामविकास, संस्कार आणि राष्ट्रसेवा यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. गुरुदेवांचे विचार त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कृतीतून पोहोचवले.


Post a Comment
0 Comments