अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ. निलेश विश्वकर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नगरसेवकांच्या हक्कासाठी नगरसेवक मैदानात
चांदूर रेल्वे :- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अधिकृतरित्या नामांकन सादर केले.
नामांकन अर्ज दाखल करताना चांदूर रेल्वे नगराध्यक्ष डॉ. प्रियांका विश्वकर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षवर्धन पुंडकर, प्रदेश सचिव राजेंद्र पातोडे आणि जिल्हाध्यक्ष राहुल मेघ्राम हेही उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. पालिका सदस्य हर्षल वाघ, अहिरंत गोडाम, संजय चौपगार, प्राजक्ता किल्लेवार, अभय तायडे, बाबाराव गायकवाड, सुरेंद्र खंडारे, रमेश आठवले, सागर भावते, प्रशांत गजभिये आणि आनंद इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नामांकन प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Post a Comment
0 Comments