*यशवंत लॉन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा ऐतिहासिक पुढाकार: धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून ‘एस.आय.आर.’ प्रशिक्षण शिबिराचा राज्यव्यापी शुभारंभ!*प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांचे कार्यकर्त्यांना डिजिटल व संघटनात्मक क्रांतीचे आवाहन
![]() |
खासदार बळवंतराव वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख आणि वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा एल्गार
अभिजित सपकाळ आणि अक्षय राऊत यांनी दिले ‘एस.आय.आर.’ प्रणालीचे तांत्रिक प्रशिक्षण
धामणगाव रेल्वे:
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत व हायटेक करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या ‘एस.आय.आर.’ (SIR) प्रशिक्षण शिबिराचा मुख्य शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सर्वप्रथम धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून केला. चांदुर रेल्वे येथील प्रसिद्ध 'यशवंत लॉन' येथे हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण शिबिराला कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षण शिबिराचे मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब उपस्थित होते. यशवंत लॉन येथील आपल्या अभ्यासपूर्ण व धडाडीच्या मार्गदर्शनात त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, "बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. चांदूर रेल्वेच्या भूमीतून सुरू झालेली ही प्रशिक्षण मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला एक नवी दिशा आणि ऊर्जा देईल." प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर करून निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘एस.आय.आर.’ प्रक्रियेचे सखोल तांत्रिक प्रशिक्षण:
शिबिराच्या मुख्य सत्रात मुख्य प्रशिक्षक श्री. अभिजित सपकाळ आणि श्री. अक्षय राऊत यांनी यशवंत लॉन येथे उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 'एस.आय.आर.' प्रणालीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल दृकश्राव्य (Audio-Visual) माध्यमातून सविस्तर प्रशिक्षण दिले. या प्रणालीद्वारे मतदारांशी थेट संपर्क कसा साधावा, पक्षाचे बूथ व्यवस्थापन कसे मजबूत करावे आणि डेटा व्यवस्थापनाचा वापर करून विरोधकांचे अपप्रचार कसे हाणून पाडावेत, याबद्दल अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. उपस्थित कार्यकर्त्यांच्या शंकांचेही त्यांनी यावेळी निरसन केले.
काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती:
या कार्यक्रमाला अमरावतीचे लोकप्रिय खासदार आदरणीय बळवंतराव वानखडे, राज्याचे माजी मंत्री डॉक्टर सुनीलजी देशमुख, धामणगाव मतदार संघाचे माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप, अमरावती महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विलासजी इंगोले आणि अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. बबलूभाऊ शेखावत हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार बळवंतराव वानखडे म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा आहे आणि या आधुनिक शिक्षणामुळे कार्यकर्त्यांची ताकद अधिक वाढेल. माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनीही स्थानिक पातळीवर पक्ष अधिक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.
धामणगाव मतदार संघाला बहुमान:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या अत्यंत महत्त्वाच्या आणि राज्यासाठी पथदर्शी ठरणाऱ्या अभियानाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम धामणगाव रेल्वे मतदार संघातून केल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यशवंत लॉन येथील या भव्य शिबिराला धामणगाव, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय., सेवादल आणि निष्ठावंत कार्यकर्ते व उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि यशवंत लॉन येथील नियोजनासाठी स्थानिक काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




Post a Comment
0 Comments