Type Here to Get Search Results !

लाडली पूर्वी बहुउद्देशीय संस्थेचे बहुआयामी उपक्रम उत्साहात; योग, नृत्य, चित्रकला स्पर्धांसह वृक्षारोपणाने सांगता*

*लाडली पूर्वी बहुउद्देशीय संस्थेचे बहुआयामी उपक्रम उत्साहात; योग, नृत्य, चित्रकला स्पर्धांसह वृक्षारोपणाने सांगता*
*अमरावती* – लाडली पूर्वी बहुउद्देशीय संस्था, अमरावती यांच्या वतीने 1 ते 12 जून 2026 या कालावधीत आरोग्य, शिक्षण, कला व पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थी, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

*1 ते 5 जून: निःशुल्क योग कार्यशाळा*  
कार्यक्रमाची सुरुवात 1 ते 5 जून दरम्यान आयोजित निःशुल्क योग कार्यशाळेने झाली. योग प्रशिक्षिका समीक्षा कोल्हे यांनी विद्यार्थी व नागरिकांना योग, प्राणायाम, ध्यान तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. पाच दिवसांच्या या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

*6 ते 10 जून: नृत्य कार्यशाळा*  
6 ते 10 जून दरम्यान नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नृत्य प्रशिक्षक ऋषिकेश श्रीनाथ यांनी विद्यार्थ्यांना विविध नृत्यशैलींचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांमुळे कार्यशाळेला विशेष रंगत आली.

*10 व 11 जून: चित्रकला व निबंध स्पर्धा*  
10 जून रोजी "पर्यावरण संवर्धन" या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छता, प्रदूषणमुक्त भारत आणि निसर्गरक्षण यांसारख्या विषयांवर आकर्षक व संदेशपर चित्रे सादर केली. 

11 जून रोजी निबंध लेखन स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, शिक्षण, सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रनिर्माण यांसारख्या विषयांवर प्रभावी विचार मांडले.

*प्रमाणपत्र वितरण समारंभ*  
11 जून रोजीच योग व नृत्य कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनीष जी. गुळ्हाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून मिशन आयएएस अकॅडमीचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोरे, तर विशेष अतिथी म्हणून रविश अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय संस्थेच्या सचिव डॉ. पूजा एम. गुळ्हाणे यांनी केले.

प्रारंभी सदस्य महेश आडे यांनी अध्यक्ष मनीष जी. गुळ्हाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुणे डॉ. नरेशचंद्र काठोरे, विशेष अतिथी रविश अग्रवाल, योग प्रशिक्षिका समीक्षा कोल्हे आणि नृत्य प्रशिक्षक ऋषिकेश श्रीनाथ यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 

योग व नृत्य कार्यशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच चित्रकला व निबंध स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

*12 जून: वृक्षारोपणाने समारोप*  
कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त 12 जून रोजी संस्थेतर्फे जिजाऊ नगर गार्डन व पुंडलिक नगर परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजात आरोग्य, शिक्षण, कला, महिला कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी लाडली पूर्वी बहुउद्देशीय संस्था भविष्यातही अशाच उपयुक्त, समाजाभिमुख व लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करीत राहील. संस्थेच्या माध्यमातून महिला, विद्यार्थी, युवक व नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रशिक्षण, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व पर्यावरणपूरक कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments