Type Here to Get Search Results !

महर्षी वाल्मिकी पायी दिंडी सोहळ्याचे खालखोनी वरुन १९ जुनला पंढरपुरकडे प्रस्थान झाले आहे*

*महर्षी वाल्मिकी पायी दिंडी सोहळ्याचे  खालखोनी वरुन १९ जुनला पंढरपुरकडे प्रस्थान झाले आहे*
*खोलापुर*:- येथुन जवळच असलेल्या खालखोनी गावातुन प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा खालखोनी सामदा काशीपुर ते श्री क्षेत्र पंढरपुरकडे १९ जुनला दिंडी प्रमुख तथा महर्षी वाल्मिकी पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान झाले असुन. या वर्षी पायी दिंडीचे ११ वे वर्षे आहे.
   श्री महर्षी वाल्मिकी पायी पालखी सोहळा  १९ जुन रोजी नर्मदेश्वर महादेव मंदिर खालखोनी येथुन सकाळी ९ वाजता अभिषेक व विधी युक्त पुजण करुन. खालखोनी गावातुन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. १८ जुलैला (पंढरपुर प्रवेश) आणि २९ जुलैला सकाळी गोपाळपुर येथे काल्याचे किर्तन होईल त्यानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे.  *कोळी याची किर्ती वाढले गहन/केले रामायण रामाआधी//*  सालाबादप्रमाणे वाल्मिकी पायी दिंडी सोहळा ब्रम्हलिन ऋषी संत घुसरकर महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने तथा मठाधिपती ऋषीवर्य ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या प्रेरणेने व गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज इंगळे रा सोनारखेडा व गुरुवर्य रंगराव महाराज आखतवाडा यांच्या कृपा आशिर्वादाने वाल्मिकी पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे निघाला आहे. या पालखी सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून श्री महर्षी वाल्मिकी पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टचे  विश्वस्त म्हणून श्री सुनिलभाऊ  जिवणराव घावट, श्री. सुभाषराव समाधान घावट, रा घुसरवाडी, श्री राजुभाऊ रौराळे रा सरमसपुर, श्री.ह.भ.प. नारायण महाराज दुर्गे रा खारतळेगाव, श्री युवराजभाऊ वानखडे रा कुमागड, श्री राजुभाऊ वानखडे रा वडाळा घाटखेडा, प्रामुख्याने उपस्थित होते. आणी  त्याचप्रमाणे किर्तनकार गायक मंडळी म्हणून विणेकरी ह.भ.प. गोलु महाराज निमकर रा सासन, मृंदंगाचार्य ह.भ.प. सार्थक महाराज गाळे, ह.भ.प. रमेश महाराज गाळे, श्री समर गाळे रा खालखोनी, ह.भ.प. सुनिल महाराज घुसे, विशाल महाराज वाकोडे रा आपातापा, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज सातव रा बेदरखेडा, ह.भ.प. उमेश महाराज रावणकर, ह.भ.प. शुभम महाराज रावणकर रा हरताळा,‌ युवाकिर्तन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील खालखोनीकर,‌ ह.भ.प. तन्मय महाराज झासकर रा-खोलापुर,‌ ह.भ.प. ईश्वर महाराज धांडगे रा पातोंडा, ह.भ.प. रामेश्वर महाराज घावट, ह.भ.प. पंढरी महाराज घावट, ह.भ.प. धनराजभाऊ खोडे रा घुसरवाडी, श्री गजाननभाऊ टेकाडे रा अमरावती, ह.भ.प. संजयभाऊ भुजाडे रा खोलापुर वाहणाची सेवा म्हणून श्री मनोजभाऊ राऊत रा वडुरा, श्री बाळुभाऊ अवघड रा मार्कंडा, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पुसदकर, चोपदाराची सेवा करणारे ह.भ.प. दिनेशभाऊ भारसाकळे रा दर्यापूर, ह.भ.प.‌संतोषभाऊ चव्हाण रा वडुरा श्री मंगेश सुलतान खालखोनी, या पालखी सोहळ्यात असंख्य महिला पुरुष मंडळी सहभागी झाले आहेत. दि १९ जुलै २०२६ ते दि:-२६ जुलै २०२६ पर्यंत महाक्षेत्र पंढरपूरमध्ये वैकुंठवासी ग्यानदेवराव टपके रा आष्टी यांच्या स्मरणार्थ श्री अशोकराव टपके भागवत कथेच आयोजन केले आहे. , कथा वाचक भागवताचार्य ह.भ.प. निलेश महाराज सुरंदसे रा हरताळा विषेश म्हणजे या वर्षी महाक्षेत्र पंढरपूरमध्ये आद्य कवी महर्षी वाल्मिकी मठाकरिता आठ गुंठे‌ जागा घेतली आहे. आणी पंधरा लाख रुपये देऊन ईसार पावती केली आहे. वाल्मिकी मठा‌च्या जागेकरिता एकंदरित पन्नास लाख रुपये पर्यंत खर्च येणार आहे. "साळंकृत कन्या दान/पृथ्वी दानाके‌ समान//" म्हणून ज्या भाविक भक्तांनी या जागे करिता ‌देणगी द्यायची असेल त्यांनी सढळ हाताने सहकार्य करुन महापुण्यास भागिदार व्हावे असे आव्हान करण्यात आले. पाचहजार रुपये व त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या दान दात्यांची नावे लाईफ टाईम वाल्मिकी मठावर छापल्या जाईल. मुक्कामाचे ठिकाण दिनदयाळ महादेव मंदिर चंद्रभागेच्या तीरी काॅटेज हाॅस्पिटल जवळ (रामबाग) पंढरपुर. येथे राहणार आहे. अशि माहिती श्री महर्षी वाल्मिकी पायी दिंडी सोहळ्याचे संचालक श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments