धामणगावच्या महाराजस्व अभियानातून साडेतीन हजार गरजूंना आधार!
वेगवेगळ्या योजनांचा एका छताखाली लाभ
मतदार संघातील साडे पाच हजार नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
धामणगाव रेल्वे .सा सक्षम पुकार/ RS NEWS सक्षम महाराष्ट्र.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून आ. प्रतापदादा अडसड यांच्या पुढाकाराने तिन्ही तालुक्यातील ३ हजार ८७० गरजूंना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ एका छताखाली देऊन आधार देण्यात आला. दरम्यान ४३ महिला बचत गटांना ३० कोटींचे अर्थ सहाय्य तसेच कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा ट्रॅक्टर, दोन हार्वेस्टर या शिबिरात देण्यात आले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व माजी स्व अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्य राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आ. प्रतापदादा अडसड यांच्या पुढाकाराने महसूल विभागाने
धामणगाव मतदार संघातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील जनतेसाठी प्रशासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपलब्ध करून रविवारी धामणगाव येथील गणेश इन लॉन येथे महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले होते
जमिनीचे पट्टे वाटप, निराधाराना अर्थसहाय्य
तिन्ही तालुक्यातील ७० लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे, दोनशे घरकुलधारकांना प्रमाणपत्र, चारशे निराधार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ . पाचशे गरजूंना रेशन कार्ड वितरण सह उत्पन्न दाखल्यासह जातीचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड, गावठाण नकाशा अशा अनेक प्रकारचे दाखले एकाच दिवशी शेकडो लाभार्थ्यांना देण्यात आले. धामणगाव नगर परिषदेच्या वतीने दिव्यांगाना तीन चाकी सायकल देण्यात आल्या तीस विभागातर्फे लावण्यात आलेल्या स्टॉल वर नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शेवटच्या माणसाच्या समस्या सोडवा- आ प्रतापदादा अडसड
मतदार संघातील सर्वसामान्य माणूस आपली मोलमजुरी पाडून तसेच सर्व कामे सोडून या शिबिरात आलेत त्यामुळे प्रशासनाने प्रत्येकाची समस्या ऐकून तातडीने या समस्या सोडव्या तसेच प्रत्येक गावात आयोजित जनकल्याण शिबिरातील तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश या शिबिरातून आमदार प्रतापदादा अडसड यांनी दिले. साठ वर्षात जे गत सरकारने केले नाही ते या केंद्र व राज्य शासनाने सर्वांगीण विकासाची कामे केली आहे समाजातील शेवटचा घटक सक्षम व्हावा यासाठी दोन्ही शासन अग्रेसर आहे प्रशासकीय यंत्रणे प्रत्येकाला न्याय देणे अपेक्षित असल्याचे मत नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड रोठे यांनी व्यक्त केले. आ. प्रतापदादा अडसड यांच्या संयमी, विकासाचे ध्येय व कार्य कुशल्येमुळे मतदार संघाचा विकास झपाट्याने सुरू असल्याचे मत नांदगावच्या नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी मत मांडले.
गरजूंना खऱ्या अर्थाने मिळणार लाभ -डॉ नयना मुंडे
शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हे अभियान असून
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे सामान्य माणसाची कामे झपाट्याने करून आपल्या विरुद्ध कोणीही तक्रार करणार नाही याची दखल प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी असे स्पष्ट मत अमरावती विभागाच्या महसूल आयुक्त डॉ. नयना मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर धामणगाव विधानसभेचे प्रमुख, अभियान संयोजक रावसाहेब रोठे, उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, उपाध्यक्ष गिरीश मुंदडा प्रमोद वानरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दुर्गाबक्षसिंह ठाकुर ,तहसीलदार अभय घोरपडे, अश्विनी जाधव, पूजा माटोळे, मुख्याधिकारी पूनम कळंबे गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे सेजल शेलार, राणी माळवे न प उपाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल राशिद,यांची उपस्थिती होती.
चिमुकल्यांनी पंढरीच्या वारीने केले स्वागत
प्रवेश द्वारावर आ.प्रतापदादा अडसड, विभागीय आयुक्त डॉ नयना मुंडे ,नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड व प्रमुख अतिथी येताच चिमुकल्यांनी हातात टाळ मृदंग घेत प्रमुख अतिथीचे स्वागत केले तर उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे तहसीलदार अभय घोरपडे यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देत स्वागत केले यावेळी एमपीएससी परीक्षेत भरारी घेतलेल्या गुणवंताचा गौरव करण्यात आला
Post a Comment
0 Comments