अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती जिल्हा शाखा, नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त बस स्थानक परिसरात श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती जिल्हा शाखा, नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त बस स्थानक परिसरात श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्य, त्याग व बलिदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे मौन पाळून कारगिल युद्धातील वीर जवानांना अभिवादन केले. "भारत माता की जय", "वंदे मातरम्" आणि "भारतीय सेना अमर रहे" अशा देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
याच प्रसंगी नांदगाव खंडेश्वरचे वीरपुत्र शहीद विकास ऊईके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अद्वितीय शौर्याला व राष्ट्रसेवेतील सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यात आले. देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवानांचे स्मरण करत त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत कार्यकारणी सदस्य तेजस पाठक ,नगरमंत्री अक्षय मारोटकर, ओम मोरे, ओम काळेकर, प्रसाद भगत शुभम परसनकर, देवेश लोखंडे, कार्तिक डोक, विवेक सोनोने, ओम कणसे, श्रेयस पाठक, सौरव प्रधान, आदित्य वानखडे, हिमांशू निखार, कृष्णा तडस, विश्वेश्वर काळबांडे, श्रेयस मारोटकर, प्रसाद चांदणे, रुद्रेश राऊत, चेतन्य केवट, मनीष पनकुडी, सम्यक आढाव, ऋषिकेश शेगोकार, राहुल बाळापुरे, अपूर्व मेश्राम यांच्यासह अभाविपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments