Type Here to Get Search Results !

कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदीला सुरुवात नांदगाव खंडेश्वरात शेतकऱ्यांचा उत्साह पहिली खरेदी 4101 रुपये भावाने

 कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदीला सुरुवात नांदगाव खंडेश्वरात शेतकऱ्यांचा उत्साह  पहिली खरेदी 4101 रुपये भावाने



नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी


नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून सोयाबीन खरेदीला अधिकृत सुरुवात झाली. या खरेदी उपक्रमात धानोरा मोगल येथील शेतकरी रामभाऊ कोळमकर यांनी पहिली सोयाबीन विक्री केली. अडते निलेश डकरे व व्यापारी अमोल शिरभाते, मंगरूळ चव्हाळा यांनी या सोयाबीनची खरेदी केली. सोयाबीनला सुरुवातीचा दर किलोमागे ₹4101 मिळाला.

या शुभारंभ सोहळ्याला बाजार समितीचे सभापती प्रभात पाटील ढेप, उपसभापती विलास पाटील सावदे, संचालक पंकज ठाकरे, संचालक विवेक वैष्णव, संचालक जितेश जांगडा, तसेच व्यापारी वर्गातून सतीशभाऊ शिरभाते, गजानन गिड्डे, हरिभाऊ पुसदकर, अविनाश शिरभाते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बाजार समितीचे सचिव अमित मोहोड, तसेच अविनाश कथलकर, आकाश शिंदे, अतिश काकडे आदी कर्मचारी, पदाधिकारी आणि तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोयाबीन हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी मंडळींमध्ये मोठा उत्साह असून, बाजार समितीमार्फत होणारी पहिली खरेदी पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करून उपस्थित राहिले. प्रारंभी मिळालेला दर समाधानकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.     RS NEWS सक्षम महाराष्ट्र                      यावर बातम्या व जाहिराती करिता       संपर्क-9860021481.                    राजीव शिवणकर 

Post a Comment

0 Comments