समाजकार्यात सक्रिय असलेले सुरज वासुदेव मालवीय यांनी आपल्या अन्य कार्यकर्त्यांसह माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा प्रवेश समारंभ पार पडला. अमरावती शहरात आयोजित एका कार्यक्रमात सुरज मालवीय यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. मालवीय यांच्यासोबतच त्यांच्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांनीही भाजपची वाट धरली. पालकमंत्री बावनकुळे यांनी मालवीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यायावेळी बोलताना माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी सांगितले की, "सुरज मालवीय यांच्यासारखे तळमळीचे आणि जनसामान्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद निश्चितच वाढेल. त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा उपयोग पक्षाला होईल."
या प्रवेशानंतर सुरज मालवीय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या जनहिताच्या धोरणांवर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. यापुढेही भाजपच्या माध्यमातून जनसेवा करण्याचे माझा उद्दिष्ट राहील."
सूरज मालवीय यांच्या प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक बांधणीला आणखी बळकटी मिळेल, असा विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.
RS NEWS सक्षम महाराष्ट्र बातम्या व जाहिराती करिता संपर्क 9860021481 मुख्य संपादक ,राजीव शिवनकर



Post a Comment
0 Comments