Type Here to Get Search Results !

ओम परब्रम्ह श्री राणा गणपतेश्वर बाबांचा 24 वा पुण्यतिथी सोहळा 3 नोव्हेंबर पासून.. विविध समाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन. .

 ओम परब्रम्ह श्री राणा गणपतेश्वर बाबांचा 24 वा पुण्यतिथी सोहळा 3 नोव्हेंबर पासून..

विविध समाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे  आयोजन. .



ता.प्र.:- 

              ओम राणा गणपतेश्वर बहुऊदेशिय सेवा संस्था,इंदिरा नगर चांदुर रेल्वे द्वारा  ओम परब्रम्ह श्री राणा गणपतेश्वर मंदिरात श्री.राणा गणपतेश्वर बाबांचा  24 व्या पुण्यतिथी  सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहाने करण्यात येत आहे. बाबांच्या ह्या पुण्यतिथी सोहळा निमित्य दिनांक 3 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत संस्थानाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमांमध्ये स्वछता अभियान ,ग्रामगिता प्रवचन ,समुदायिक प्रार्थना व ध्यान तसेच भक्तिमय संगीत व भजनंनाजली अशा अनेक कार्यक्रमाचा समावेश आहे.तसेच दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्री 11:45 ला वैकुंठ चतुर्दशी च्या दिवशी बाबांच्या समाधीचे महाद्वार उघडून विधिवत पूजा अर्चा करून बाबांच्या मूर्तीचा अभिषेक  केला जाईल. हा भक्तिमय सोहळा  अनेक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता बाबांच्या पालखीचे परिसरातून भ्रमन होईल व सकाळी 11 ;00 वाजता सोनी मराठी फेम ' कोण बनणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ? ह्या कार्यक्रमात नामलौकिक प्राप्त ह.भ.प.पंकज महाराज पोहकार यांच्या मधुर वाणीतून काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर दुपारी 1:30 वाजता महाप्रसादाला सुरवात होईल.परिसरातील सर्व भाविकांनी ह्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष शशिकांत वाल्दे, रवी वाल्दे ,कचरूजी अंभीरे, सचिव सचिन गुल्हाने , सहसचिव रोशन वझे ,आणि कोषाध्यक्ष  सौ.प्रिया वाल्दे व भक्तपरिवारातील सर्व सदस्यांनी केले आहे.                                RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करिता संपर्क -9860021481मुख्य संपादक राजीव शिवणकर 

Post a Comment

0 Comments