Type Here to Get Search Results !

श्रीश्याम जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न होणार*श्याम मंदिरात मुर्तीची कमल-पुष्पांची आरास व विशाल भजन संध्या

 श्रीश्याम जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न होणार*श्याम मंदिरात मुर्तीची कमल-पुष्पांची आरास व विशाल भजन संध्या






धामनगांव रेल्वे -



  कलीयुगात राजस्थान येथील खाटु नरेश श्रीश्यामबाबां च्या भक्तांत दिवसा गणीक वाढ होत आहे सर्व धर्मीय भक्तजन आपल्या सुख दुखाची ग्राहणी घेऊन नियमित श्यामबाबांना पुजीतात आणी आपले नवस फेडतात अश्याच दिव्य शक्ती चा जन्मोत्सव दिनांक १व २ नोव्हेंबर ला धामनगांव रेल्वे येथे संपन्न होणार आहे 


  राजस्थानातील जयपुर पासुन ८० कीलोमीटर अंतरावरील खाटु श्याम आज विश्वविख्यात झालेले आहे जेथे दररोज दर्शनसाठी भारताच्या कानाकोपर्यातून हजारों भक्तगण येतात तर विवीध उत्सवाला लाखोंच्या संख्येत दर्शनार्थी खाटु ला जातात अश्याच लाखों लाख भक्तांचे श्रध्दा स्थान असलेल्या खाटु नरेश श्यामबाबांचा जन्मोत्सव दिनांक शनिवार१ व रविवार २ नोव्हेंबरला धामनगांव नगरीत थाटात संपन्न होणार आहे ज्यात स्थानीय श्रीबालाजी -खाटुश्याम मंदिराला आकर्षक विद्युत रोषनाई व फुलांनी सजवीले जाईल गाभार्यातील श्रीश्याम मुर्तीला कमल-पुष्पांचा श्रृंगार करण्यात येणार आहे सोबतच नवसाला पावणारी दिव्य ज्योति, श्यामबाबा ला छप्पन भोग अर्पण व भक्तांसाठी विशाल श्रीश्याम भजन संध्येत विदर्भताली सुविख्यात भजन गायक कुमार योगेश यांचे सुश्राव्य वाणीतुन  "श्रीश्याम से अरदास" श्याम आराधना होईल ज्यात वर्धा, पुलगांव, आर्वी, चंद्रपुर, यवतमाल, चांदुर रेल्वे व धामनगांव रेल्वे पंचक्रोशीतील भावीक भक्त हजेरी लावतात भजन संध्ये नंतर श्रीश्याम बाबांची महाआरती होऊन प्रसाद वितरण केले जाते .


 २१ डीसेंबर २०१६ ला स्थापित श्रीबालाजी -खाटुश्याम मंदिर च्या अंतर्गत कार्यरत श्रीबालाजी -खाटुश्याम सेवा समिति द्वारे निराधार, निराश्रित व दिव्यांग व्यक्तींसाठी घरपोच निःशुल्क टीफीन सेवा अविरत चालु आहे समितीचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ही योजना ३६५ दिवस राबवीण्यात येते पाऊस, वारा किंवा ऊन असो दररोज दुपारी १२ वाजता निःशुल्क टीफीन संबंधित व्यक्तींच्या घरी पोहचवीण्यात येते सेवा समिति द्वारा फाल्गुन मेला , रामनवमी उत्सव, हनुमान जन्मोत्सव, श्रावण महीन्यात शिव शंकराचा अभिषेक, धन्वंतरि जयंती, दिपावली उत्सव , कार्तिक महिन्याच्या एकादशीला श्रीश्याम जन्मोत्सव सारखे धार्मिक अनुष्ठान आयोजित करण्यात येतात विशेष म्हणजे फाल्गुन मेला ५ किंवा ७ दिवसाचा असतो यात दररोज धार्मिक किर्तन , भंडारा (प्रसादरुपी) असतो याचा हजारों भक्त लाभ घेतात कलीयुगातील श्रीकृष्णा द्वारे वरदानीत श्रीश्यामबाबां बद्दल श्रध्दा व आस्था दिवसा गणीक वाढत आहे 

  स्थानीय शर्मा गल्ली त श्रीश्याम दरबार चे भक्तगण  व गुलज़ारीलाल शंकरलाल शर्मा द्वारे श्रीश्याम जन्मोत्सव साजरा होत आहे यात सकाली विशाल निशाण यात्रा नगर भ्रमण करेल सायंकाली ७ वाजता एक शाम खाटु नरेश के नाम भजन संध्येत सुवीख्यात गायक कुशल शर्मा व गौरीश शर्मा आपल्या सुमधुर वाणीतुन श्याम भक्तांना मंत्रमुग्ध करतील सोबती श्यामबाबा चा अलौकिक श्रुंगार, कौन बनेगा बनेगा बाबा के छप्पन भोग का हकदार हे राहील व दिनांक २ नोव्हेंबर ला दुपारी अन्नकुट होईल तसेच शिवाजी वार्ड येथील ब्रिजमोहन शर्मा कड़े सुध्दा श्याम जन्मोत्सवा निमीत्य श्याम भजन संध्या होईल.

Post a Comment

0 Comments