घोडे सर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण झळाळा! विजय चमूचा जल्लोषात स्वागत व सत्कार.
शिक्षण क्षेत्रासोबतच क्रीडा- क्षेत्रात सुद्धा उंच भरारी...
*चांदूर रेल्वे (प्रतिनिधी):
*शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य घोडे सर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय बॉक्सिंग आणि अॅडव्हान्स बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ११ पदके पटकावली.*
*यामध्ये 4 सुवर्ण (Gold), 5 रौप्य (Silver) आणि 2 कांस्य (Bronze) पदकांचा समावेश आहे.*
*या यशामुळे घोडे सर अकॅडमीचा “विजयी चमू” संपूर्ण चांदूर रेल्वे तालुक्याचा अभिमान बनला आहे.*
*कोच संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये*
*अफस्या शहा (सुवर्ण) क्षितिज मुधोळकर( सुवर्ण) तृप्ती जगताप (सुवर्ण) रेखाशी डोंगरे (सुवर्ण) पार्थ जोगदडे (रोप्य) नैतिक कानेटकर (रोप्य )सांजवी वानखडे (रोप्य) सर्वज्ञ सांभारे (रोप्य)भूषण टोटे (रोप्य) वंश लोखंडे (कास्य) आयुष माहुलकर (कास्य) विद्यार्थ्यांचा समावेश आहे.*
*या सर्व विजेत्यांचा घोडे सर अकॅडमी तर्फे जल्लोषात सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. अंकुश घोडे सर (संचालक) होते, तर या सोहळ्यास कोच संदीप देशमुख सर, ऍड. लकी डोंगरे, समाजसेवक चेतन भोले,आकाश मोटघरे सर, श्री. मनोज सांधेकर सर शुभम पुरोहित सर, सर हे मान्यवर उपस्थित होते.*
*विद्यार्थ्यांना फुलांचा गुच्छ, व गळ्यात हार घालून गौरव करण्यात आला.*
*या वेळी घोडे सर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळातही कौशल्य दाखवले आहे. ही केवळ स्पर्धेतील विजय नाही, तर आत्मविश्वासाचा विजय आहे.”खेळ हे व्यक्तिमत्त्व घडवणारे माध्यम आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली ही सुवर्ण कामगिरी भविष्यातील अधिक मोठ्या यशाची नांदी ठरेल.”*
*पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण वातावरण जयघोषाने दणाणून गेले.*
*कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीचा जयघोष करत सर्वांचे आभार मानले.*
*विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या*.✨💐




Post a Comment
0 Comments