Type Here to Get Search Results !

कंत्राटदारांनी मजुरांना भेट म्हणून टिफिन बॉक्स वाटले मजुरांसोबत आदर आणि आनंद वाटून दिवाळी साजरी केली.

 कंत्राटदारांनी मजुरांना भेट म्हणून टिफिन बॉक्स वाटले मजुरांसोबत आदर आणि आनंद वाटून दिवाळी साजरी केली



चांदूर रेल्वे


चांदूर रेल्वे शहरातील सरकारी कंत्राटदारांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या मजुरांना टिफिन बॉक्स भेट म्हणून दिले. कामगारांसोबत आदर व्यक्त करण्याचा आणि आनंद वाटून घेण्याचा हा अनोखा मार्ग कार्यक्रमादरम्यान दिसून आला या भेटवस्तू केवळ मजुरांसाठी उपयुक्त नाहीत तर त्यांच्यात चांगले संबंध निर्माण करण्यास देखील मदत करतात. टिफिन बॉक्स ही मजुरांसाठी एक उपयुक्त आणि व्यावहारिक भेट आहे, ज्याचा वापर ते रोजंदारीसाठी बाहेर पडताना जेवणासाठी करू शकतात. चांदूर रेल्वे शहरातील शासकीय ठेकेदार यांचे बागापूर, चांदूररेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच पुलगाव, 

धामणगाव गावता बांधकामांचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे या कामांवर दररोज १५० ते २०० कामगारांना रोजगार देतात या वर्षी दिवाळी भेट म्हणून भोजन टिफिनची व मिठाई भेट देण्यात आली ही भेट म्हणजे कामगारांच्या प्रती आदर आणि कौतुक व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग आहे, ज्यामुळे कंत्राटदार आणि कामगारांमध्ये मजबूत आणि सकारात्मक संबंध निर्माण होतात.यावेळी सरकारी कंत्राटदार सागर जाणे, पप्पू सोळंके, सचिन खंडार, सूरज चौधरी आणि अभिषेक इखे यांनी या दिवाळीच्या सणानिमित्त त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना कृतज्ञता व्यक्त करण्याची ही अनोखी पद्धतीने दिवाळी साजरी केली 


 प्रत्येक इमारतीमागे कामगारांचे कष्ट असतात. पप्पू सोळके, कंत्राटदार, चांदूर रेल्वे


"प्रत्येक इमारतीमागे कामगारांचे कष्ट असतात. कामगारांच्या कष्टाशिवाय कोणतीही मोठी रचना उभी राहू शकत नाही.

तर, या दिवाळीत गरीब कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी होती, जी आम्ही खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केली. कंत्राटदारांच्या वतीने, आम्ही सर्व कामगारांच्या कुटुंबांना आनंदी, समृद्ध आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा देतो.".           

Post a Comment

0 Comments