शिरजगाव कसबा येथे श्रीमद् भागवत सप्ताह कथेचे आयोजन तारीख 8 शनिवारला कार्तिक त्रिजठा भव्य रथोत्सव
शिरजगाव कसबा--
" दान धर्मम मोक्ष धर्मम.. मोक्ष प्राप्ती करिता सत्कर्म प्रमाणेच दानधर्म महत्त्वाचे " कथा वाचक हभप श्री सोपान महाराज मुंडे यांचे कथा मधील वक्तव्य "
शिरजगाव कसबा येथील कार्तिक स्वामी मंदिर परिसरातील आठवडी बाजार परिसरात कार्तिक उत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा सप्ताह तारीख ३१ ते ६ पर्यंत कथेचे आयोजन केले आहे कथावाचक श्री सोपान महाराज मुंडे यांच्या वाणी मधून श्रीमद् भागवत कथा वाचन सुरू आहे दरवर्षी या गावात कार्तिक त्रिजेठेला येथे भव्य पारंपारिक रथोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासल्या जात आहे पंचकोशीतील गावातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक महिन्यातील समाप्ती सोहळा येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो
गावातील कार्तिक स्वामी महाराज गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन महिलांकरिता फक्त एक दिवस कार्तिक पौर्णिमेचा असतो पण यावर्षी ग्रंथ पंचांग नुसार महिलांकरिता कार्तिक स्वामी महाराजांचे दर्शन वर्जित असल्याने महिलांना दर्शन घेता येणार नाही अशी माहिती कार्तिक स्वामी मंदिर संस्थान कडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा कार्तिक त्रिजठा रथोत्सव या गावी होत असल्याने जिल्हा व स्थानिक प्रशासन रथोत्सव कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी नियोजन करीत पासून संबंधित गावातील ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते व सरपंच प्रवीण खेरडे यांच्या मार्गदर्शनात ग्रा.पंचायत कार्यालय कर्मचारी यांनी कार्तिक समाप्ती रथ उत्सवानिमित्त ग्राम स्वच्छता ,रथ उत्सव मुख्य मार्ग तसेच भाविकांच्या गैरसोय असुविधा होऊ नये याकरिता तयारीला लागली आहे त्या अनुषंगाने गावातील दर शनिवार भरत असलेला आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे यावर्षी शनिवार दिवशीच कार्तिक रथोत्सव समाप्ती असल्याने भाविकांना कोणतीही गैरसोय अडथळा निर्माण होऊ नये याकरिता शनिवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच प्रवीण खेरडे यांनी दिली महावितरण वीज कार्यालय सहायक अभियंता हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचाऱ्यांनी रथोत्सव मुख्य मार्गावरील विद्युत पुरवठा वीज प्रवाह तारांपासून अडथळा निर्माण होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आली असून शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन ठाणेदार महेंद्र गवई यांनी गावातील सर्व कार्तिक उत्सव मंडळांच्या पदाधिकारी व स्वयंसेवक कार्यकर्त्यांची शांतता मीटिंग घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे कार्तिक साई स्वामी मंदिर संस्थान अध्यक्ष विनायक गुर्जर यांनी सर्व भाविकांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे तसेच भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.




Post a Comment
0 Comments