_*नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025*_
*अमरावती विभागातील 45 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी 320 उमेदवार अध्यक्ष पदासाठी, 5,067 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार*
• *2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी*
अमरावती, दि.28 : राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागातील 41 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 320 उमेदवार अध्यक्ष पदाकरिता, तर 5,067 उमेदवार सदस्य पदाकरिता निवडणूक लढविणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी, अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. तसेच सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी दि. 3 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 10.00 वाजेपासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.
*जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे :*
*अमरावती* जिल्ह्यातील 12 नगरपरिषद/नगरपंचायतीत (चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, नांदगाव- खंडेश्वर(न.पं.), धारणी(न.पं.), धामणगाव रेल्वे, वरुड, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, शेंदूरजना घाट, मोर्शी चिखलदरा) एकूण 71 उमेदवार अध्यक्ष पदासाठी, तर 1,255 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार आहे. तसेच चिखलदरा नगरपरिषदेत एक सदस्य बिनविरोध आहे.
*अकोला* जिल्ह्यातील 6 नगरपरिषद/नगरपंचायतीत (अकोट, बाळापूर, मुर्तीजापूर, तेल्हारा, हिवरखेड, बार्शीटाकळी) एकूण 39 उमेदवार अध्यक्ष पदासाठी तर 707 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार आहे.
*यवतमाळ* जिल्ह्यातील 11 नगरपरिषद/नगरपंचायतीत (यवतमाळ, आर्णी, दारव्हा, ढाणकी (न.पं.), दिग्रस, घाटंजी, नेर-नबाबपूर, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, वणी) एकूण 88 उमेदवार अध्यक्ष पदासाठी, तर 1,387 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार आहे.
*बुलडाणा* जिल्ह्यातील 11 नगरपरिषद/नगरपंचायतीत (बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव-जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा, शेगाव, सिंदखेडराजा) एकूण 87 उमेदवार अध्यक्ष पदासाठी, तर 1,170 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार आहे. तसेच मलकापूर नगरपरिषदेत दोन सदस्य आणि खामगाव नगरपरिषदेत एक सदस्य बिनविरोध आहेत.
*वाशिम* जिल्ह्यातील 5 नगरपरिषद/नगरपंचायतीत (वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव(न.पं.)) एकूण 35 उमेदवार अध्यक्ष पदासाठी, तर 548 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार आहे.

Post a Comment
0 Comments