Type Here to Get Search Results !

धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणूक डॉ.अर्चना अडसड रोठे (अक्का) च सक्षम— कपिल पडघान विरोधकाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका.

 धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणूक डॉ.अर्चना अडसड रोठे (अक्का) च सक्षम— कपिल पडघान 

विरोधकाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका.





 धामणगांव रेल्वे



धामणगांव रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी  दिलेल्या खास मुलाखतीत महत्त्वपूर्ण विधान केले. विकासासाठी सक्षम नेतृत्व मिळाल्यास धामणगावचा चेहरामोहरा बदलणार असून, विकास भाजपा पॅनल व नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवार डॉ. अर्चना अडसड-रोठे (अक्का) निवडून आल्या तर विकासाचे दारे नक्की उघडतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कपिल पडघान म्हणाले की,

“केंद्रात, राज्यात आणि धामणगाव विधानसभा क्षेत्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे निधी, योजना व विकासकामांना गती मिळणे स्वाभाविक आहे. डॉ. अर्चना अडसड-रोठे या प्रशासकीय दृष्टीकोन असलेले सक्षम नेतृत्व आहे. धामणगावच्या प्रत्येक भागाचा विकास हा त्यांचा मुख्य हेतू आहे.”


यावेळी विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले,

“विरोधकांकडे मुद्दे नसल्याने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र नागरिकांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये. विकासाच्या प्रश्नावर जनतेने योग्य निर्णय घ्यावा.”


धामणगांवमधील राजकीय वातावरणाला वेग येत असताना कपिल पडघान यांनी केलेले हे विधान विशेष महत्त्वाचे ठरत आहे.

Post a Comment

0 Comments