नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी
बघत रहा संपूर्ण अपडेट यावर![]() |
अमरावती, : आगामी नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, मतदानाच्या दिवशी, म्हणजेच उद्या, २ डिसेंबर २०२५ रोजी, सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी किंवा कामाच्या वेळेत विशेष सवलत देणे आस्थापनांना बंधनकारक करण्यात आले आहे.
लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार, निवडणूक असलेल्या क्षेत्रातील मतदार असलेले आणि उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना (उदा. कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खासगी कंपन्या, आयटी कंपन्या, मॉल्स इत्यादी) या नियमांचे पालन करतील.
विशेषतः, कामासाठी निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही ही सुट्टी मिळणार आहे.
धोकादायक किंवा लोकोपयोगी सेवांमध्ये (उदा. आपत्कालीन सेवा) पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित कामगारांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे.
आस्थापना मालकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा सुट्टी न मिळाल्याच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल ,असे आवाहन कामगार उप आयुक्त अधीक्षक नि. रा. सरोदे यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments