जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अप्रतिम कलाविष्कार जीप मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून आयोजित सांस्कृतिक व विविध स्पर्धांचे तालुकस्तरावर आयोजन
चांदूर रेल्वे:-
आज दिवसभर जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचा परिसर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विविध रंगानी व त्यांच्या विविध वेशभूषेण सजला होता एकी कडे नृत्य, दुसरीकडे नाटिका तर कुठे समूह गान अशा विविध स्पर्धा पाहायला मिळाल्या निमित्त होत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून आयोजित व्यक्तिमत्व विकासावर आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धेच्या आयोजनाचे. तालुकस्तरावर गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनात गटसाधन केंद्रातर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आनंददाई शनिवार उपक्रमांतर्गत शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धेला जिल्हास्तरावर सन्मान मिळावा व या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुनांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन जिल्हातील सर्व तालुक्यात घेण्यात आले, केंद्र स्तरावर झालेल्या या स्पर्धेतील विजयी चमूंना व विद्यार्थ्यांना तालुक्यावर बोलविल्या गेले होते त्याचेच आयोजन चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत गटसाधन केंद्रामार्फत आज करण्यात आले होते दोन दिवसीय या विविध स्पर्धेत समूह गायन, समूह नृत्य, समूह नाटिका, प्रश्न मंजुषा, स्पेल बी, चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात तालुक्यातील एकूण सहा केंद्रातून दोनशेच्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
-------
यावेळी उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी संजय खारकर, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र दिवाण, केंद्र प्रमुख किरण पाटील, सुरेश दामले, रामदास भाग्यवंत, सुभाष सहारे, विजय सगणे, राजेंद्र वानखडे, आदि उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वितेसाठी स्पर्धेचे तालुका समन्वयक म्हणून विषय साधन व्यक्ती विवेक राऊत, सबाहा शेख, निखिल दानापूरकर, वर्षा गादे, आशिष उल्हे, विशेष शिक्षक रणजित राजूरकर, श्रीकृष्ण हीवराळे, अनिल गोंडसे, दीपमाला कुमरे, अश्विनी पोकळे, सुनील धोंडे, यांनी परिश्रम घेतले तर परीक्षक म्हणून उज्वल पंडेकर, तेजस लहाने, सीमा मेहंगे, पल्लवी गावंडे, स्वप्नाली देशमुख, उमेश वाडेकर, यांनी काम पाहिले.
------------
जिल्हयावर विजयी विद्यार्थ्यांना मिळणार विमान प्रवास
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेच्या काही स्पर्धांमधील अंतिम विजेत्यांना थेट विमान प्रवास मिळणार असून या प्रकारच्या सार्वजनिक स्पर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास वाढीसाठी महत्वाच्या ठरत असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.
--------





Post a Comment
0 Comments