सुदर्शन समाजासाठी ऐतिहासिक क्षण — अॅड. सौ. कीर्ती राहुल इमले यांचे भव्य स्वागत
चांदूर रेल्वेच्या राजकीय इतिहासात प्रथमच सुदर्शन समाजाकडून निवडणूक लढवून उमेदवाराने विजय मिळवत समाजाचा गौरव वाढविला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी सुदर्शन समाजाच्या यशस्वी सून अॅड. सौ. कीर्ती राहुल इमले यांनी साध्य केली आहे. त्यांच्या या दैदीप्यमान विजयामुळे केवळ त्यांचेच नव्हे, तर संपूर्ण सुदर्शन समाजाचे नाव उज्ज्वल झाले आहे. ही उपलब्धी समाजातील सर्व बंधू-भगिनींसाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे.
या गौरवपूर्ण यशाच्या निमित्ताने दिनांक 24/12/2025 (बुधवार) रोजी सुदर्शन समाजाच्या वतीने त्यांचा भव्य सन्मान व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. सायंकाळी 6:00 वाजता समाजबांधव एकत्र जमले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, फटाके व आतषबाजीसह जुलूस काढत श्री राहुल इमले यांच्या निवासस्थानी पोहोचून अॅड. सौ. कीर्ती राहुल इमले व श्री राहुल इमले यांचा पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला तसेच मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित समाजबांधवांनी ढोल-ताशांच्या तालावर जल्लोषात नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान मित्र परिवारातील नगरसेवक श्री मोहम्मद अनिस शेख गफ्फार तसेच नगरसेविका सौ. प्रियंका सतपाल वरठे यांचाही पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
समारंभात उपस्थित सर्व समाजबांधवांनी उत्साह व उल्लासात नृत्य करून या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला. आज सुदर्शन समाजाकडे समाजाच्या समस्या, हक्क व हितांसाठी ठामपणे लढणारा एक सक्षम लोकप्रतिनिधी आहे, ही बाब समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, सुदर्शन समाजाची एकजूट, जागरूकता आणि प्रगतशील विचारधारेचे सशक्त प्रतीक आहे. समाजातील प्रत्येक सदस्यासाठी हा क्षण प्रेरणादायी,गौरवशाली व अविस्मरणीय ठरेल.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क मुख्य संपादक राजीव शिवणकर



Post a Comment
0 Comments