सुट्टीच्या दिवशी न प काम ला गती, न प अध्यक्षांनी घेतला कर्मचाऱ्यां सोबत शिक्षकांच्या कामाचा आढावा
,
चांदुर रेल्वे / शहरातील रडखडलेले विकास कामांना गती देण्यासाठी तसेच न प शाळे अंतर्गत सुरू असलेल्या शाळांना सुसज्ज व आधुनिक पद्धतीने चालवण्या करिता निर्वाचित न प अध्यक्षिका प्रियंका विश्वकर्मा यांनी सुट्टीच्या दिवशीही कामाचा आढावा घेत आहे,
ता 9 जानेवारी रोजी कार्यालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यां सोबत आढावा बैठक घेत सूचना केली,यावेळी त्यांनी मालमत्ता कर वसुली सोबत, कर्मचाऱ्यांचे ड्रेस कोड, कार्यालयीन वेळे चे बंधन, गावातील स्वच्छता राखणे,अशा अनेक विषयावर कर्मचाऱ्यांना सूचना केल्या
ता 10 जानेवारी रोजी शहरात नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या एकूण 5 शाळा असून यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे, या शाळाना सुसज्जित करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्या वर भर देणे,तर बालपणी विद्यार्थ्यांना शाळेतून त्यांच्या खेळाला,कला, गुणांना प्रोत्साहन देणे शाळेतील मैदाने,खेळणी,किती गरजेचे आहे यासंदर्भात त्यांनी शिक्षकांना सूचना केल्या,
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला कौशल्याची त्यांनी शिक्षका कडून माहिती जाणून घेतली,ज्यावेळी विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतात त्यावेळी त्यांना आधार कार्ड संदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशा अडचणी करिता वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलून ते कशाप्रकारे सोडवता येईल या संदर्भात चर्चा करण्याची आश्वासन नगराध्यक्षिका यांनी शिक्षकांना दिले, यावेळी सर्व शिक्षक हजर होते




Post a Comment
0 Comments